IND vs SA : टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी! फक्त तीन बॉल खेळून शुभमन गिलने सोडलं मैदान, कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shubman Gill retired hurt : कर्णधार शुभमन गिलने मैदानावर उतरल्यानंतर लगेचच मैदान सोडलं. फक्त तीन बॉल खेळल्यानंतर आणि एक फोर मारल्यानंतर लगेच ड्रेसिंग रुमकडे परतला.
IND vs SA 1st Test 2nd day : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस खेळवला जात आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तासाभराच्या संघर्षानंतर, दक्षिण आफ्रिकेला अखेर दिवसाची पहिली विकेट मिळाली. यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पाठवलेला वॉशिंग्टन सुंदर 29 धावांवर बाद झाला. एडेन मार्करामने त्याला फसवलं. मात्र, त्यानंतर शुभमन गिल तीन बॉल खेळताच मैदानाबाहेर गेला. कारण काय? जाणून घ्या
भारतीय संघासाठी चिंताजनक बातमी
वॉशिंग्टन सुंदरचा बॉल स्लिपमध्ये सायमन हार्मरकडे गेला, ज्याने तो पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. भारताने 75 धावांवर दुसरी विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन शुभमन गिलला मैदानात यावं लागलं अन् याचवेळी कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी चिंताजनक बातमी समोर आली.
फिजिओसह मैदान सोडलं
advertisement
कर्णधार शुभमन गिलने मैदानावर उतरल्यानंतर लगेचच मैदान सोडलं. फक्त तीन बॉल खेळल्यानंतर आणि एक फोर मारल्यानंतर, मानेला ताण आल्याने शुभमनला फिजिओसह मैदान सोडावे लागलं. सध्या त्याच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिक माहिती उपलब्ध नाही, परंतु ऋषभ पंत बॅटिंगला परतला आहे.
टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
advertisement
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
November 15, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी! फक्त तीन बॉल खेळून शुभमन गिलने सोडलं मैदान, कारण काय?


