IND vs SA : टीम इंडियाला 42 धावा महागात पडणार, गंभीरच्या हट्टाने पुन्हा शेवट गोड नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रायपूरच्या मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 358 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे साऊथ आफ्रिकेसमोर 359 धावांचे आव्हान आहे.
India vs South Africa 2nd Odi : रायपूरच्या मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 358 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे साऊथ आफ्रिकेसमोर 359 धावांचे आव्हान आहे. पण भारत इतक्या मोठ्या धावा करून 42 धावा कमी पडला आहे. हे फक्त आणि फक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या हट्टामुळे घडलं आहे.त्यामुळे गंभीरच्या रणनितीवर टीका होते आहे.
खरं तर ज्या प्रमाणे विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडने शतकीय खेळी केली ते पाहता भारत सहज 400 पार पोहोचू शकला असता. पण गंभीरच्या त्या ऑलराऊंडर खेळाडूंना संघात घेण्याचा हट्टांमुळे भारत 5 विकेट गमावून 358 धावापर्यंतच मजल मारू शकली.
ऋतुराज आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर भारताची धावसंख्या ही 284 वर 4 बाद अशी होती.त्यावेळेस 39 ओव्हर पार पड्ल्या होत्या.आता उतल्या फक्त 11 ओव्हर म्हणजेच 66 बॉल होत्या. या 66 बॉलमध्ये भारताने किमान 120 धावा करणे अपेक्षित होते. पण भारत फक्त 74 तरच धावा जोडू शकला.कारण वॉशिंग्टन 1 धावावर रनआऊट झाला, तर रविंद्र जडेजा 27 बॉल 24 धावाच करू शकला. तर राहुलने 42 बॉल 66 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार केएल राहुल, वॉशिग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा हे तीन खेळाडू मोठ्या धावा करू शकले असते. पण हे खेळाडू खूपच हळू खेळल्यामुळे भारत ढकलंत ढकलंत 350 धावा गाठू शकला.
advertisement
गौतम गंभीर ज्या ऑलराऊंडर खेळाडूंवर जास्त भरोसा ठेवतो आणि संघाची बॅटींग लाईन मोठी करण्याचा प्रयत्न करत होता. तेच ऑलराऊंडर खेळाडू मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे भारत फक्त 358 धावाच करू शकली आणि 400 धावा करण्याहून अवघ्या 42 धावा दुर राहिली.त्यामुळे कदाचित या 42 धावा टीम इंडियाला महागात पडण्याची शक्यता आहे.
advertisement
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (w/c), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 5:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडियाला 42 धावा महागात पडणार, गंभीरच्या हट्टाने पुन्हा शेवट गोड नाही


