Virat Kohli : विराटच्या लागोपाठ दुसऱ्या शतकानंतर कशी होती गंभीरची रिएक्शन? ड्रेसिंग रूममधला Video समोर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. या सीरिजमधलं विराटचं हे लागोपाठ दुसरं शतक आहे.
रायपूर : विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. या सीरिजमधलं विराटचं हे लागोपाठ दुसरं शतक आहे, याआधी रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्येही विराटने शतकी खेळी केली होती. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे 53 वे शतक होतं. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फास्ट बॉलर मार्को यानसनला विराटने मिड-ऑनच्या दिशेने शॉट मारला आणि त्याचं लागोपाठ दुसरं शतक पूर्ण केलं. शतक केल्यानंतर विराटने नेहमीप्रमाणेच त्याच्या स्टाईलने सेलिब्रेशन केलं.
प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रतिक्रिया
कोहलीने शतक पूर्ण करताच, डग-आउटमध्ये बसलेला कोच गंभीर सर्व खेळाडूंसह उभा राहिला आणि कोहलीच्या कामगिरीला त्याने सलाम केला. गंभीरने कोहलीचे कौतुक केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही दिवसांपूर्वी कोहली आणि गंभीरमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण गंभीरने टाळ्या वाजवून किंग कोहलीच्या कामगिरीला सलाम केला.
advertisement
WHAT A FRAME.
- The Greatness Of Virat Kohli..!!!! pic.twitter.com/EljutRSSFf
— Tanuj (@ImTanujSingh) December 3, 2025
53RD ODI HUNDRED FOR KING KOHLI
- Virat Kohli is coming for 2027 World Cup..!!!!
pic.twitter.com/NCL0dG3NyE
— Tanuj (@ImTanujSingh) December 3, 2025
advertisement
शतक पूर्ण होताच, कोहलीने हवेत उडी मारली आणि त्याच्या अनोख्या शैलीत हात फिरवला. त्यानंतर काही काळ तो प्रेक्षकांचे अभिनंदन स्वीकारत राहिला. मग, दोन्ही हात वर करून त्याने देवाचे आभार मानले.
कोहलीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे 83 वे शतक आहे, ज्यामध्ये वनडे आणि कसोटी सामने समाविष्ट आहेत. कोहलीने रांचीमध्येही शतक ठोकले. विराटचं शतक झालं असलं तरी टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला आहे. भारताने दिलेलं 359 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने पार केलं आहे. एडन मार्करमचं शतक तसंच ब्रीट्झकी आणि डेवाल्ड ब्रेव्हिसच्या अर्धशतकामुळे दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या परदेशामधला हा सगळ्यात मोठा वनडे विजय आहे.
view commentsLocation :
Raipur,Chhattisgarh
First Published :
December 03, 2025 11:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : विराटच्या लागोपाठ दुसऱ्या शतकानंतर कशी होती गंभीरची रिएक्शन? ड्रेसिंग रूममधला Video समोर!


