सांस्कृतिक राजधानी पुण्यात धक्कादायक प्रकार, 2 ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई, परदेशी महिलेचं कनेक्शन
- Published by:Sachin S
Last Updated:
आरोपी आणि पीडित महिलांचे पासपोर्ट पुढील तपासासाठी एफआरओ विभागाकडे पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहे.
पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाण्याच्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरामध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंढवा पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी युगांडा देशातील एका महिलेला अटक केली आहे. तर ३ परदेशी महिलांची सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दळवी हाईट्स या निवासी भागात ही घटना उजेडात आली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी या फ्लॅटमधून सराह फियोना नागोबी (वय २७ ) या युगांडा देशात राहणाऱ्या तरुणीला अटक केली. ही तरुणी आपल्या देशातील तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं उघड झाालं. ही तरुणी पुण्यात पर्यटक व्हिसावर आली असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं.
advertisement
मुंढवा पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक केली असून तिच्या तावडीतून तिन्ही महिलांची सुटका केली आहे. आरोपी आणि पीडित महिलांचे पासपोर्ट पुढील तपासासाठी एफआरओ विभागाकडे पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्य व्यवसायाचा पर्दाफाश, २ जणांना अटक
view commentsदरम्यान, पुण्यातील हडपसर परिसरातही अशीच एक घटना उजेडात आली आहे. एका स्पा सेंटरच्या नावाखाली इथं वेश्या व्यवसाय सुरू होता, पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना अटक केली. या स्पा सेंटरमधून एक तरुणीची सुटका करण्यात आली आहे. सौरभ इंगळे (वय २८) आणि राहुल देवनाथ (वय २४) या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे-सोलापूर रोडवर असलेल्या रविदर्शन चौकात अग्रवाल कॉर्नरमध्ये युनिक स्पा मध्ये हा प्रकार सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या स्पा सेंटरमध्ये छापा टाकला आणि दोन जणांना अटक केली. या स्पा सेंटरमधून मॅनेजरसह दोन जणांना अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 11:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सांस्कृतिक राजधानी पुण्यात धक्कादायक प्रकार, 2 ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई, परदेशी महिलेचं कनेक्शन


