गर्लफ्रेंडच्या घरातील CCTV हॅक केला, अन् घरातील LIVE फुटेजमध्ये पाहिले...; हादरवणारा प्रकार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
CCTV Hacking: आसाममध्ये 12वीतील विद्यार्थ्याने गर्लफ्रेंडच्या घराचा CCTV हॅक करून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली, हे उघड होताच संपूर्ण परिसर हादरला. सुरक्षिततेसाठी लावलेले कॅमेरेच जासूसीचे शस्त्र बनू शकतात, या धक्कादायक वास्तवाने लोक चिंतेत आहेत.
नवी दिल्ली: तंत्रज्ञानाने आपले जीवन नक्कीच सोपे केले आहे, पण हेच तंत्रज्ञान चुकीच्या हातात गेले तर किती भयानक रूप धारण करू शकते याचे जिवंत उदाहरण आसाममधून समोर आले आहे. चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये आपण नेहमी पाहतो की एखादा सनकी प्रेमी आपल्या प्रेयसीवर गुप्तपणे नजर ठेवतो. मात्र आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात जे घडले, त्याने रील आणि रिअल लाईफमधील सीमारेषाच पुसली.
advertisement
12वीत शिकणाऱ्या एका मुलाने आपल्या गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तिच्या घरातील CCTV कॅमेरा थेट हॅक केला. तो आपल्या मोबाईलवरून तिच्या घरातील प्रत्येक हालचाल घरात कोण येतं, कोण जातं, ती काय करते, ती कधी घरी येते. ही 24 तास पाहत होता. जेव्हा रहिवाशांनी त्याला पकडले, तेव्हा सत्य पाहून सर्वजण थक्क झाले.
advertisement
ही घटना 29 नोव्हेंबर रोजी घडली. रहिवासी संकुलातील लोकांनी एका मुलाला संशयास्पद स्थितीत इमारतीभोवती फिरताना पाहिले. तो त्या इमारतीत राहणाऱ्या एका मुलीचा प्रियकर असल्याचे समोर आले. लोकांना त्याच्यावर संशय होता की तो वारंवार कोणत्याही कारणाशिवाय बिल्डिंगभोवती फिरतो.
अखेर स्थानिकांनी त्याला पकडून चौकशी केली. सुरुवातीला मुलगा टाळाटाळ करत राहिला, पण मोबाईल तपासल्यावर सर्वांच्या अंगावर काटा आला. त्याच्या मोबाईलवर लाइव्ह CCTV फुटेज चालू होते आणि ते फुटेज त्याच इमारतीतील एका फ्लॅटमधील म्हणजेच त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरातील होते.
advertisement
चौकशीत उघड झाले की मुलाने मुलीच्या घरातील CCTV सिस्टमला हॅक करून त्याचा अनधिकृत प्रवेश मिळवला होता. हा प्रकार स्पष्टपणे ‘डिजिटल स्टॉकिंग’ म्हणून ओळखला जातो. या कृत्याने मुलीच्या गोपनीयतेचा भंग झाला, तसेच संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्थेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक आता चिंतेत आहेत की ज्यासाठी ते CCTV बसवतात स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तेच कॅमेरा त्यांच्या हेरगिरीचे साधन बनू शकते. रहिवाशांनी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर किशोर न्याय अधिनियम, २०१५ अंतर्गत कारवाई होणार आहे.
advertisement
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांनी ही घटना नेटफ्लिक्सच्या ‘You’ या वेब सिरीजशी तुलना केली. ज्यात मुख्य पात्र तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या प्रेमिकांवर नजर ठेवते आणि शेवटी एक सायको किलर बनते. लोकांनी प्रश्न उपस्थित केला की आजची तरुण पिढी नात्यांमध्ये इतकी ‘पजेसिव्ह’ आणि संशयी का झाली आहे? प्रेमाच्या नावाखाली 24 तास नजर ठेवणे हे प्रेम नसून मानसिक आजाराचे लक्षण असल्याचे अनेकांनी म्हटले.
advertisement
घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला मुलाने हे केलं कसं? अद्याप पोलिसांनी पद्धत जाहीर केलेली नाही, पण सायबर तज्ज्ञांच्या मते याची दोन प्रमुख कारणे असू शकतात. पहिले म्हणजे बहुतेक CCTV कॅमेरे ‘Admin’ नावाने आणि ‘12345’ किंवा ‘admin’ सारख्या अगदी साध्या डिफॉल्ट पासवर्डसह येतात. लोक इंस्टॉलेशननंतर पासवर्ड बदलण्याचे कष्ट घेत नाहीत. त्यामुळे अशा कॅमेऱ्यांचे डिफॉल्ट पासवर्ड इंटरनेटवर सहज उपलब्ध असतात. त्या आधारे प्रणालीमध्ये घुसणे फार अवघड नसते. दुसरे म्हणजे काहींच्या मते मुलीने स्वतःच अनवधानाने त्याला अॅक्सेस दिला असावा, हा फक्त तर्क आहे. पण जर मुलाने लपून तिच्या फोन किंवा लॅपटॉपमधून पासवर्ड घेतला असेल किंवा वाय-फाय नेटवर्कद्वारे CCTV हॅक केले असेल, तर हा सरळ आणि गंभीर सायबर गुन्हा आहे.
advertisement
ही घटना फक्त एका मुलगा-मुलीचे प्रकरण नाही; ती संपूर्ण नवीन पिढीतील नात्यांमधील अविश्वास, असुरक्षितता आणि तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाचे भयावह रूप दाखवते. यूट्यूब आणि गूगलवर “How to hack CCTV” सारख्या व्हिडिओंची भरमार आहे. तंत्रज्ञान शिकण्यासाठी तयार केलेले प्लॅटफॉर्म आता जासूसीचे साधन बनू लागले आहेत. जेव्हा नात्यांमध्ये विश्वास कमी आणि शंका जास्त असते, तेव्हा तंत्रज्ञानाचा असा गैरवापर होतो.
आपली प्रायव्हसी कशी जपायची?
जर आपल्या घरी CCTV कॅमेरे लावले असतील, तर ताबडतोब काही महत्त्वाच्या गोष्टी करा. सर्वप्रथम डिफॉल्ट पासवर्ड बदला आणि एक मजबूत, कठीण पासवर्ड ठेवा. वाय-फाय पासवर्ड कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करू नका. जर CCTV ऍपमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुविधा असेल, तर ती त्वरित सुरू करा. यामुळे पासवर्ड माहित असला तरी ओटीपीशिवाय कोणीही अॅक्सेस मिळवू शकणार नाही. शिवाय कॅमेऱ्याचे फर्मवेअर वेळोवेळी अपडेट करत राहणे अत्यंत आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 11:10 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
गर्लफ्रेंडच्या घरातील CCTV हॅक केला, अन् घरातील LIVE फुटेजमध्ये पाहिले...; हादरवणारा प्रकार


