Indian Navy Day : इंडियन नेव्हीच्या ध्वजावर राजमुद्रेची छाप! तुम्हाला माहितीये नौदल आणि शिवाजी महाराजांचं 'हे' कनेक्शन?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Chhatrapati Shivaji Maharaj And Indian Navy Connection : आज आम्ही तुम्हाला भारतीय नौदलाचा आणि शिवाजी महाराजांचा कसा संबध आहे याबद्दल माहिती देणार आहोत. त्याचबरोबर भारतीय नौदलाचा इतिहासही सांगणार आहोत.
मुंबई : भारतीय नौदल दिन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ट्रायडंट' या नावाने कराची बंदरावर केलेल्या धाडसी आणि यशस्वी हल्ल्याच्या स्मृत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला भारतीय नौदलाचा आणि शिवाजी महाराजांचा कसा संबध आहे याबद्दल माहिती देणार आहोत. त्याचबरोबर भारतीय नौदलाचा इतिहासही सांगणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज आहेत भारतीय नौदलाचे प्रेरणास्रोत..
छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात एका शक्तिशाली आणि शिस्तबद्ध मराठा आरमाराची स्थापना केली. 'ज्याचा समुद्र, त्याचे राज्य' या तत्त्वावर विश्वास ठेवून महाराजांनी कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग सारखे अभेद्य सागरी किल्ले बांधले. समुद्रावर पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांशी यशस्वीपणे मुकाबला करण्याची क्षमता या आरमाराने ठेवली होती. नवीन ध्वजावरील राजमुद्रेचा समावेश हा भारतीय नौसैनिकांना त्यांच्या गौरवशाली सागरी वारसाची आणि स्वाभिमानाची आठवण करून देतो.
advertisement
नौदल आणि शिवाजी महाराजांचं 'हे' कनेक्शन आहे महत्त्वाचं..
भारतीय नौदलाला 2 सप्टेंबर 2022 रोजी केरळमधील कोची येथे देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' नौदलात सामील करताना नवीन ध्वज मिळाला. या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची छाप आहे.
भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचे डिझाईन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदा आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या मुद्रेचा हा गौरव आहे.
advertisement
भारतीय नौदलाचा ब्रिटिशकालीन इतिहास
भारतीय नौदलाचा इतिहास 1612 मध्ये सुरू होतो, जेव्हा कॅप्टन बेस्टने पोर्तुगीजांचा सामना करून त्यांना पराभूत केले. या कारणामुळेच ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला सूरत (गुजरात) जवळ स्वाली येथे एक छोटा लढाऊ जहाजांचा ताफा तयार करावा लागला. लढाऊ जहाजांचा पहिला स्क्वॉड्रन 5 सप्टेंबर 1612 रोजी दाखल झाला, ज्याला 'माननीय ईस्ट इंडिया कंपनीची मरीन' असे म्हटले जात असे. याचा मुख्य उद्देश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे संरक्षण करणे होता.
advertisement
बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीला 1668 मध्ये हस्तांतरित झाल्यावर, हे दल बॉम्बेच्या व्यापाराच्या संरक्षणासाठीही जबाबदार बनले. 1686 पर्यंत, जेव्हा ब्रिटिशांचा व्यापार प्रामुख्याने बॉम्बे येथे स्थलांतरित झाला, तेव्हा या दलाचे नाव बदलून बॉम्बे मरीन असे करण्यात आले. या दलाने पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि समुद्री चाच्यांविरुद्ध लढ्यात महत्त्वपूर्ण सेवा दिली. बॉम्बे मरीन मराठे आणि सिद्दी यांच्या विरुद्धच्या लढायांमध्येही सहभागी होते आणि 1824 मध्ये बर्मा युद्धातही भाग घेतला. 1830 मध्ये, बॉम्बे मरीनचे नाव बदलून हर मेजेस्टीज इंडियन नेव्ही ठेवण्यात आले. 1892 मध्ये विविध मोहिमांदरम्यान दिलेल्या सेवांचा गौरव म्हणून त्याचे नाव रॉयल इंडियन मरीन करण्यात आले.
advertisement
नामकरण आणि विस्ताराचे टप्पे
सर्वप्रथम भारतीय, ज्यांना कमिशन मिळाले, ते सब लेफ्टनंट डी.एन. मुखर्जी होते. ते 1928 मध्ये रॉयल इंडियन मरीनमध्ये इंजिनियर अधिकारी म्हणून सामील झाले. 1934 मध्ये, रॉयल इंडियन मरीनचे पुनर्गठन करून रॉयल इंडियन नेव्ही असे नामकरण करण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर, रॉयल इंडियन नेव्हीमध्ये आठ युद्धपोत होते आणि युद्धाच्या अखेरीस, तिची ताकद 117 लढाऊ जहाजे आणि 30,000 कर्मचारी इतकी वाढली.
advertisement
स्वातंत्र्यानंतर भारतीय नौसेना
view comments1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर, रॉयल इंडियन नेव्हीकडे तटीय गस्तीसाठी उपयुक्त 32 जुनी जहाजे आणि 11,000 अधिकारी व सैनिक होते. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे प्रजासत्ताक झाल्यानंतर नौदलाच्या नावातून 'रॉयल' हा उपसर्ग काढून टाकण्यात आला आणि ती भारतीय नौसेना बनली. 22 एप्रिल 1958 रोजी व्ही अॅडम आरडी कटारी यांनी नौदल स्टाफचे पहिले भारतीय प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अशा प्रकारे, भारतीय नौदलाचा ध्वज आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारसाची आणि स्वदेशी सामर्थ्याची खूण घेऊन भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 10:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Indian Navy Day : इंडियन नेव्हीच्या ध्वजावर राजमुद्रेची छाप! तुम्हाला माहितीये नौदल आणि शिवाजी महाराजांचं 'हे' कनेक्शन?


