IND vs SA : 'लकी' मॅन आला अन् आफ्रिकेने गेम फिरवला, रांचीचा हिशोब रायपूरला चुकता केला!

Last Updated:

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा 4 विकेटने ऐतिहासिक विजय झाला आहे. भारताने दिलेलं 359 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावून 49.2 ओव्हरमध्येच पार केलं.

'लकी' मॅन आला अन् आफ्रिकेने गेम फिरवला, रांचीचा हिशोब रायपूरला चुकता केला!
'लकी' मॅन आला अन् आफ्रिकेने गेम फिरवला, रांचीचा हिशोब रायपूरला चुकता केला!
रायपूर : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा 4 विकेटने ऐतिहासिक विजय झाला आहे. भारताने दिलेलं 359 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावून 49.2 ओव्हरमध्येच पार केलं. एडन मार्करम हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला, मार्करमने 98 बॉलमध्ये 110 रन केले, तर मॅथ्यू ब्रीट्झकीने 68 आणि डेवाल्ड ब्रेविसने 34 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. याशिवाय कर्णधार टेम्बा बऊमाने 46, कॉर्बिन बॉशने नाबाद 26 रनची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या त्यांच्या देशाबाहेरचा हा सगळ्यात मोठा वनडे विजय आहे. भारताकडून अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना 2-2 विकेट मिळाल्या, तर हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेचा लकी मॅन

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाचं कमबॅक झालं. रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टेम्बा बऊमा खेळला नव्हता, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता. पण आता बऊमाचं कमबॅक होताच दक्षिण आफ्रिका विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. याआधी टेम्बा बऊमा कर्णधार झाल्यापासून दक्षिण आफ्रिकेने 12 टेस्ट मॅच खेळल्या, ज्यापैकी 11 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला तर एक सामना ड्रॉ झाला.
advertisement

विराट-ऋतुराजची शतकं

विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या दोघांची शतकं आणि कर्णधार केएल राहुलच्या अर्धशतकामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 50 ओव्हरमध्ये 358/5 एवढा स्कोअर केला. ऋतुराज गायकवाडने 83 बॉलमध्ये 105 आणि विराटने 93 बॉलमध्ये 102 रनची खेळी केली. केएल राहुलने 43 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'लकी' मॅन आला अन् आफ्रिकेने गेम फिरवला, रांचीचा हिशोब रायपूरला चुकता केला!
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement