IND vs SA : आफ्रिकेविरूद्ध ज्याला संघात संधी दिली नाही, त्यानेच गंभीर आगरकरची बोलती बंद केली, पाहा एकदा काय केलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ज्या खेळाडूला मुख्य कोच गौतम गंभीर आणि निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर यांनी आफ्रिकेविरूद्ध संघात संधी दिली नाही आहे.त्यानेच आता या दोघांची बोलती बंद केली आहे.
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियममध्ये सूरू असलेल्या सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे.कारण टीम इंडियासमोर 548 धावांच लक्ष्य आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताने 2 विकेट गमावून 27 धावा केल्या होत्या.त्यामुळे पाचव्या दिवशी भारताना 522 धावा करायच्या आहेत. या धावा करणे अशक्यच आहे. त्यामुळे टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार आहे.दरम्यान ज्या खेळाडूला मुख्य कोच गौतम गंभीर आणि निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर यांनी आफ्रिकेविरूद्ध संघात संधी दिली नाही आहे.त्यानेच आता या दोघांची बोलती बंद केली आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आहे. मोहम्मद शमी सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळतो आहे.या स्पर्धेत खेळताना त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. ही गोलंदाजी पाहता त्याला टीम इंडियात संधी मिळेल?अशी चर्चा होती. पण त्याला संधी मिळाली नव्हती.
advertisement
Gautam Gambhir and Ajit Agarkar ended his career too. 🥲
Did you know Shami has hit more sixes in Tests than both Gambhir and Agarkar?
Shami - 25 Six
GG & AA - 13 Six pic.twitter.com/isAb6LIYxF
— D.S. Bhati (@DSCricinfo789) November 25, 2025
advertisement
दरम्यान जरी मोहम्मद शमीला संधी मिळाली नसली तरी त्याने बोलती बंद केल्याची चर्चा आहे. कारण सोशल मीडियावर काही फॅन्सनी मोहम्मद शमी आणि गौतम गंभीर, अजित आगरकरचे काही आकडे शेअर केले आहेत. हे आकडे पाहता शमीने त्याच्या कामगिरीने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे.
advertisement
गौतम गंभीरने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 58 सामने खेळले आहेत. या 58 सामन्यांमध्ये 10 षटकार मारले आहेत. तर अजित आगरकरने त्याच्या टेस्ट कारकिर्दीत 3 षटकार मारले होते. या तुलनेत मोहम्मद शमीने 63 टेस्ट सामन्यात 25 षटकार मारले आहेत. त्यामुळे या दोन्ही सिनिअर खेळाडूंच्या तुलनेत मोहम्मद शमीचा आकडा जास्त आहे.
advertisement
मोहम्मद शमी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने सक्रिय आहे. पण फिटनेसच्या समस्यांमुळे त्याला टीममध्ये स्थान मिळू शकले नाही. 64 टेस्टमध्ये 229 विकेट घेणाऱ्या शमीने शेवटची टेस्ट 2023 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळली.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 9:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : आफ्रिकेविरूद्ध ज्याला संघात संधी दिली नाही, त्यानेच गंभीर आगरकरची बोलती बंद केली, पाहा एकदा काय केलं?


