IND vs SA : गिल खेळला नाही, तर गुवाहाटीमध्ये महापराक्रम होणार, 148 वर्षांच्या इतिहासात जग पहिल्यांदाच अशी मॅच पाहणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीमध्ये होणारी दुसरी टेस्ट मॅच आधीच चर्चेत आली आहे, याच कारण म्हणजे या सामन्यात होऊ घातलेला संभाव्य विक्रम जो भारतीय क्रिकेटमध्ये फार कमी लोकांना अपेक्षित होता.
गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीमध्ये होणारी दुसरी टेस्ट मॅच आधीच चर्चेत आली आहे, याच कारण म्हणजे या सामन्यात होऊ घातलेला संभाव्य विक्रम जो भारतीय क्रिकेटमध्ये फार कमी लोकांना अपेक्षित होता. कर्णधार शुभमन गिल जर या सामन्यात खेळू शकला नाही, तर टीम इंडिया या सामन्यात तब्बल 7 डावखुरे बॅटर घेऊन मैदानात उतरेल. टेस्ट क्रिकेटमधला हा अत्यंत दुर्मिळ सामना ठरेल.
गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून टीममध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. तसंच टीम इंडियाही संक्रमणाच्या काळातून जात आहे. कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडिया 6 डावखुऱ्या बॅटरना घेऊन मैदानात उतरली होती. आता गुवाहाटीमध्ये ही संख्या 7 पर्यंत पोहोचू शकते, कारण टीमचा कर्णधार शुभमन गिल याला दुखापत झाली आहे, तसंच त्याचं गुवाहाटीमध्ये खेळणं कठीण वाटत आहे.
advertisement
गिलच्या जागेवर दोन दावेदार
शुभमन गिल खेळू शकला नाही तर त्याची जागा घेण्यासाठी दोन दावेदार आहेत. साई सुदर्शन किंवा देवदत्त पडिक्कल या दोघांपैकी एकाची टीम इंडियात निवड होऊ शकते, हे दोघेही डावखुरे बॅटर आहेत. टीममध्ये आधीच यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे डावखुरे बॅटर आहेत. भारतीय टीमने यातल्या एकाला वगळले तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये 7 डावखुरे बॅटर असतील. नितीश कुमार रेड्डीही भारतीय टीममध्ये आहे, पण त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
दक्षिण आफ्रिकेची फास्ट बॉलिंग जागतिक दर्जाची आहे, त्यामुळे ते टीम इंडियाच्या डावखुऱ्या बॅटिंग लाईनअपविरुद्ध प्लानिंग करू शकतात. कोलकात्यामध्ये 6 डावखुऱ्या बॅटरना घेऊन खेळताना टीम इंडियाला अडचणी आल्या होत्या, त्यामुळे गुवाहाटीमध्ये 7 डावखुरे बॅटर मैदानात उतरले, तर निकाल काय लागणार? याची भीती भारतीय चाहत्यांना वाटत आहे. कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रननी पराभव झाला आहे, त्यामुळे गुवाहाटीमध्येही पराभव झाला तर सीरिज 2-0 ने गमावण्याची नामुष्की टीम इंडियावर उद्भवेल.
view commentsLocation :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
November 20, 2025 10:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : गिल खेळला नाही, तर गुवाहाटीमध्ये महापराक्रम होणार, 148 वर्षांच्या इतिहासात जग पहिल्यांदाच अशी मॅच पाहणार!


