Dharmendra Health Update: 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार, आजारी वडिलांसाठी सनी देओलचा मोठा निर्णय

Last Updated:

Dharmendra Latest Health Updates: धरम पाजींना रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून, त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. वडिलांची काळजी घेण्यासाठी सनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने देशभरात चिंतेचे वातावरण होते. त्यांच्या आरोग्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. मात्र, आता धरम पाजींना रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून, त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. या कठीण काळात मुलगा सनी देओल वडिलांसोबत सावलीसारखा उभा राहिला आहे. वडिलांची काळजी घेण्यासाठी सनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
धर्मेंद्र यांच्या पूर्ण रिकव्हरीसाठी सनी देओलने कोणताही विचार न करता आपल्या आगामी आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सनी देओल दिग्दर्शक नितीश तिवारी यांच्या भव्य चित्रपट 'रामायण' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२६ मध्ये, तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी सनी देओलचा मोठा निर्णय

advertisement
'रामायण' च्या दुसऱ्या भागाचे उर्वरित शूटिंग याच वर्षाच्या अखेरीस सुरू होणार होते, पण कलाकारांच्या वैयक्तिक अडचणी लक्षात घेऊन निर्मात्यांनी ते पुढे ढकलले आहे. दुसऱ्या भागाचे जवळपास ४० ते ५० दिवसांचेच काम शिल्लक आहे, पण वडिलांची प्रकृती स्थिर होईपर्यंत सनी देओलने यावर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
धर्मेंद्र यांच्या पूर्ण रिकव्हरीकडे सनी देओलचे सध्या पूर्ण लक्ष आहे. वडिलांची प्रकृती पूर्णपणे सुधारल्याशिवाय तो कामावर परतणार नाही. सनी देओलने ठरवले आहे की, जोपर्यंत वडील धर्मेंद्र पूर्णपणे बरे होत नाहीत, तोपर्यंत ते घरावर आणि कुटुंबावरच लक्ष केंद्रित करतील. या काळात ते ना कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग करतील, ना इतर कोणत्याही प्रोजेक्टवर काम करतील.
advertisement

धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर

रुग्णालयातून घरी आल्यानंतर अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार आणि देखरेख सुरू आहे. या सर्व परिस्थितीनंतर आता जानेवारीमध्येच 'रामायण' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे काम सुरू होईल, असे मानले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra Health Update: 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार, आजारी वडिलांसाठी सनी देओलचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement