IND vs SA : टीम इंडियाच्या खेळाडूचं करिअर संपणार? इरफान सारखी गत होणार, 'ग्रेग चॅपेल पठाण एक्सपेरीमेंट' भारी पडणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाच्या एका खेळाडूच करिअर संपुष्ठात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे टीम इंडियातला हा इरफान पठाण कोण आहे? आणि त्याच्यासोबत कशाप्रकारचे एक्सपेरिमेंट सुरु आहेत? हे जाणून घेऊयात.
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर सूरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियावर पराभवाचं संकट आहे.हे संकट असताना आता टीम इंडियाच्या एका खेळाडूचं करिअर संपुष्ठात येण्याची शक्यता आहे.कारण या खेळाडूसोबत जसं एक्सपेरींमेट सूरू आहे ते पाहता, 2007-08 साली जसं इरफान पठाण सोबत घडलं होतं, एक्सपेरीमेंटमुळे त्याचं करिअर संपलं होतं.तशाच एक्सपेरिमेंटमुळे आता टीम इंडियाच्या एका खेळाडूच करिअर संपुष्ठात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे टीम इंडियातला हा इरफान पठाण कोण आहे? आणि त्याच्यासोबत कशाप्रकारचे एक्सपेरिमेंट सुरु आहेत? हे जाणून घेऊयात.
खरं तर सध्या टीम इंडियातला इरफान पठाण हा वॉशिंग्टन सुंदर आहे. वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंड विरूद्ध ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर शतकीय खेळी केली होती. या त्याच्या खेळीमुळे आणि जडेजाच्या साथीमुळे टीम इंडियाला हा सामना ड्रॉ करण्यात यश आले होते. त्यामुळे वॉशिंग्टनच्या शतकीय खेळीनंतर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याच्यावर एक्सपेरीमेंट करायला सूरूवात केली आहे. गौतम गंभीरने सुंदरला गोलंदाजीसह फलंदाजीत ट्रेन करायला सूरुवात केली आहे. हीच गोष्ट साऊथ आफ्रिकेचा पहिल्या टेस्ट दरम्यान दिसून आली.
advertisement
गौतम गंभीरने साऊथ आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या टेस्ट दरम्यान वॉशिंग्टन सुंदरला बॅटींगमध्ये प्रमोट करत तिसऱ्या स्थानी फलंदाजीसाठी पाठवले होते. यावेळी वॉशिंग्टन सुंदर पहिल्या डावात 29 तर दुसऱ्या डावात 31 धावाच करू शकला. या सामन्यात त्याला गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही.त्यामुळे एकंदरीत तो या एक्सपेरीमेंटनंतर फारशा धावा करू शकला नाही. त्यामुळे एकंदरीत गौतम गंभीरच हे एक्सपेरीमेंट कुठेतरी फ्लॉप ठरले.त्यामुळेच दुसऱ्या टेस्ट सामन्यात गौतम गंभीरने वॉशिंग्टन सुंदरसोबत कोणताही प्रयोग केला नाही.
advertisement
अशा एक्सपेरीमेंटमुळे अनेकदा खेळाडूच करीअर संपलं आहे. इरफान पठाणसोबत तसंच घडलं होतं. 2005 ते 2007 दरम्यान ग्रेग चॅपेल भारताचे मुख्य कोच होते. त्यावेळेस इरफान पठाणने स्विंग गोलंदाजी करून एकच धुमाकुळ माजवला होता.इरफानची फलंदाजीही चांगली होती,त्यामुळे ग्रेग चॅपेल यांनी त्याला ऑलराऊंडवर म्हणून पूर्णपणे विकसित करण्याचा प्रयत्न केला. यासाठी चॅपेल यांनी श्रीलंका आणि साऊथ आफ्रिके विरूद्धच्या दौऱ्यात इरफान पठाणला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर खेळताना इरफानने 40 धावा केल्या होत्या. ही झाली टेस्ट फॉरमॅटची गोष्ट. वनडे फॉरमॅटमध्ये देखील इरफान पठाणला 5,6 किंवा 7 ऐवजी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जायचे.
advertisement
या दरम्यान सूरूवातील त्याने 40 च्या सरासरीने फलंदाजी केली आणि विकेटसही घेतल्या. पण नंतर टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीमुळे त्याच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम झाला. तो पुर्वीसारखी गोलंदाजी करू शकला नाही,त्याने स्विंगही गमावला आणि स्पीडही कमी झाली.पुढे सतत बॅटींग ऑर्डर बदलल्यामुळे त्याला मानसिक दडपण आले आणि तो गोलंदाज म्हणून अपयशी ठरला आणि त्याचं करीअरही संपल. पुढे जाऊन ग्रेग चॅपेलने या गोष्टीची कबुली त्यांच्या पु्स्तकात दिली.
advertisement
आता हीच गोष्ट टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदरसोबत सूरू आहे. गौतम गंभीर वॉशिंग्टन सुंदरसोबत वेगवेगळे एक्सपेरीमेंट करत आहे.हे एक्सपेरीमेंट पाहता वॉशिंग्टन सुंदरच देखील करिअर संपेल?अशी भीती क्रिकेट फॅन्सना वाटते आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडियाच्या खेळाडूचं करिअर संपणार? इरफान सारखी गत होणार, 'ग्रेग चॅपेल पठाण एक्सपेरीमेंट' भारी पडणार


