Smriti Mandhana Marriage : स्मृती-पलाशच्या नात्यात दुरावा? Viral WhatsApp चॅटचं सत्य काय? लग्नाच्या आदल्या रात्री काय घडलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नावरून अफवाचं पेव फुटलं आहे. 23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाश यांचं सांगलीमध्ये लग्न होणार होतं, पण अचानक हे लग्न स्थगित करण्यात आलं.
मुंबई : क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नावरून अफवाचं पेव फुटलं आहे. 23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाश यांचं सांगलीमध्ये लग्न होणार होतं, पण अचानक हे लग्न स्थगित करण्यात आलं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधाना यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पुढे ढकललं गेल्याचं सांगण्यात आलं, यानंतर स्मृतीच्या वडिलांना सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
स्मृती आणि पलाशचं लग्न पोस्टपोन झाल्याचं सांगण्यात येत असतानाच आता सोशल मीडियावरच्या चर्चांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. लग्न पुढे ढकललं गेल्यानंतर लगेचच पलाश मुच्छल याने स्मृतीला धोका दिल्याचे आरोप सोशल मीडियावर सुरू झाले आहेत. याबद्दलचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर पलाश मुच्छलचे एका महिलेसोबतचे कथित चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल व्हायला लागले. हे फोटो सगळ्यात आधी मेरी डिकोस्टा नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने शेअर केले. यानंतर रेडिटवरही हे स्क्रीन शॉट व्हायरल झाले. ज्या अकाऊंटवरून या पोस्ट केल्या गेल्या ते अकाऊंट आता डिएक्टिव्हेट केलं गेलं आहे. News18 Marathi या स्क्रीनशॉटच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
advertisement
advertisement
हे कथित चॅट मे 2025 चे असल्याचं सांगण्यात येत आले. ज्यात पलाश मुच्छल या महिलेला स्विमिंगसाठी बोलवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. महिला जेव्हा त्याला रिलेशनबद्दल विचारते तेव्हा तो टोलवाटोलवीची उत्तरं देतो आणि वारंवार भेटण्याचा आग्रह धरतो, असं चॅटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर एक्स (ट्विटर) वर प्रतिक्रियांचा पाऊस आला आहे. अनेकांनी हे चॅट्सपाहून आपल्याला धक्का बसल्याच्या तर काहींनी निराश झाल्याच्या कमेंट केल्या. तर काही यूजर्सनी चॅटच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'हे पाहून Sick वाटलं, लोकांमध्ये अजिबात लाज राहिली नाही', अशी प्रतिक्रिया एकाने दिली. तर 'भावाने मोठ मोठी जेस्चर करून तिचा विश्वास जिंकला आणि मग आरामात चिटिंग केली', अशी कमेंट दुसऱ्याने केली. 'आजच्या सोशल मीडियाच्या जगात काहीही एडिट केलं जावू शकतं, त्यामुळे घाईमध्ये निर्णयापर्यंत येऊ नका', अशी कमेंटही काही यूजर्सनी केली आहे.
advertisement
स्मृतीने फोटो-व्हिडिओ डिलीट केले
दरम्यान स्मृती मानधनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून साखरपुडा, मेहेंदी, हळद तसंच लग्नासंबंधी सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. दुसरीकडे पलाशची बहीण पलक मुच्छल हिने स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पुढे ढकललं गेलं आहे. या कठीण परिस्थितीमध्ये दोन्ही कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर राखा, अशी पोस्ट पलक मुच्छलने केली होती. पण पलकच्या या पोस्टनंतरही सोशल मीडियावरच्या चर्चा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana Marriage : स्मृती-पलाशच्या नात्यात दुरावा? Viral WhatsApp चॅटचं सत्य काय? लग्नाच्या आदल्या रात्री काय घडलं?


