IND vs SA : कॅप्टन्सीसाठी शुभमन गिल करतोय जिवाशी खेळ? BCCI ने दिली गुड न्यूज, पण डॉक्टरांचं म्हणणं वेगळंच! पाहा काय?

Last Updated:

BCCI On Shubhman Gill Medical Update : बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या उपचारांना शुभमन गिल चांगला प्रतिसाद देत आहे. तो 19 नोव्हेंबर 2025 रोजी संघासोबत गुवाहाटीसाठी प्रवास करणार आहे.

BCCI On Shubhman Gill Medical Update
BCCI On Shubhman Gill Medical Update
Shubhman Gill Medical Update : कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त झालेल्या टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल याच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वपूर्ण मेडिकल अपडेट (Medical Update) समोर आले आहे. कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गिलला मानेला दुखापत झाली होती. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर त्याला तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. पण शुभमन गिल जिवासोबत खेळतोय का? असा सवाल विचारला जात आहे.

शुभमन संघासोबत गुवाहाटीसाठी प्रवास 

रुग्णालयात गिलला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने दिलेल्या उपचारांना शुभमन गिल चांगला प्रतिसाद देत आहे. तो 19 नोव्हेंबर 2025 रोजी संघासोबत गुवाहाटीसाठी प्रवास करणार आहे. मग शुभमन गिल दुखापत असताना मॅच खेळणार की काय? असा मोठा प्रश्न विचारला आहे.
advertisement

प्रकृतीचा अंदाज घेऊन निर्णय - बीसीसीआय

शुभमन गिल याच्या प्रकृतीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सतत लक्ष ठेवून असेल. त्याच्या दुसऱ्या कसोटीतील सहभागाबाबतचा अंतिम निर्णय त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन नंतर घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. मात्र, शुभमन गिलला प्रवास करण्यास किंवा विमानाने कुठेही जाण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. तर आता शुभमन दुखापतग्रस्त असताना जिवाशी खेळतोय का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement

पुन्हा कसोटी संघात सामील होणार? 

दरम्यान, शुभमन गिल जर अशा दुखापतीमध्ये खेळला तर ते आश्चर्य असेल, असं डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे शुभमनच्या निर्णयावर बीसीसीआयचं देखील लक्ष असणार आहे. TimesofIndia.com ने दिलेल्या वृत्तानुसार, शुभमन गुरूवारी गुवाहटीला येथे पुन्हा कसोटी संघात सामील झाला. जर गिल मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. अशातच गंभीरच्या भूमिकेवर देखील लक्ष असेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : कॅप्टन्सीसाठी शुभमन गिल करतोय जिवाशी खेळ? BCCI ने दिली गुड न्यूज, पण डॉक्टरांचं म्हणणं वेगळंच! पाहा काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement