IND vs SA Final : 1,2,3... 140 कोटी भारतीयांची श्वास रोखणारी ती कॅच, VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Last Updated:

साऊथ आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना काहीशी मॅच फिरली आहे.ही मॅच फिरण्यास कारणीभूत ती कॅच ठरली आहे.या कॅचने 140 कोटी भारतीयांची श्वास रोखला होता. ही कॅच नेमकी कुणी घेतली आणि कशी पकडली? हे जाणून घेऊयात.

India Vs South Africa
India Vs South Africa
India vs South Africa Final : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपचा फानयल सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. कारण साऊथ आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना काहीशी मॅच फिरली आहे.ही मॅच फिरण्यास कारणीभूत ती कॅच ठरली आहे.या कॅचने 140 कोटी भारतीयांची श्वास रोखला होता. ही कॅच नेमकी कुणी घेतली आणि कशी पकडली? हे जाणून घेऊयात.
खरं तर साऊथ आफ्रिकेचे एका बाजूने एका मागून एक विकेट पडत असताना दुसरीकडे कर्णधार लौरा व्होल्वार्डने एका बाजूने डाव सावरला होता. सामन्यात एक वेळ अशी होती की ती सामना जिंकून बाहेर पडेल असे वाटत होते. भारतीय फॅन्स तिच्या विकेटची प्रतिक्षा करत होते. आणि अखेर तो क्षण आलाच.
advertisement
दिप्ती शर्माच्या बॉलवर व्होल्वार्डने मोठा शॉर्ट खेळला होता.हा बॉल इतका उंचावर होता की कॅच पकडणे खूपच अवघड होते. पण अमनज्योतने पहिल्या प्रयत्नात बॉल पकडतान उडाला, दुसऱ्यांदाही तेच झालं पण तिसऱ्यांदा तिने कॅच पडकली आणि भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारी व्होल्वार्ड 101 धावांवर आऊट झाली. ही कॅच पाहताना सर्व भारतीयांचा श्वास रोखला होता.
advertisement
टीम इंडिया वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
दक्षिण आफ्रिका वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : 1,2,3... 140 कोटी भारतीयांची श्वास रोखणारी ती कॅच, VIDEO पाहून अंगावर काटा येईल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement