VIDEO : शेकहँड केला, कडकडून मिठी मारली, पराभवानंतर साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय संघाने दिला धीर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताच्या खेळाडूंनी पुढे जाऊन खचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची गळाभेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. या संदर्भातला आता व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून भावूक व्हायला होत आहे.
India vs South Africa Final : वुमेन्स वर्ल्ड कपचा फायनल सामना जिंकून भारताने इतिहास रचला आहे. तर साऊथ आफ्रिकेला विजयाचा नजीक येऊन झालेला पराभव जिव्हारी लागला आहे.त्यामुळे अनेक खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते. त्यावेळी भारताच्या खेळाडूंनी पुढे जाऊन खचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची गळाभेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. या संदर्भातला आता व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून भावूक व्हायला होत आहे.
advertisement
खरं तर भारताने साऊथ आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत वर्ल्ड कपची फायनल जिंकली होती. या विजयानंतर भारताने मैदानात भन्नाट जल्लोष केला. खेळाडूंनी एकमेकांच्या गळ्यात पडून हा विजय साजरा केला.त्याचसोबत मैदानात एक चक्कर मारून फॅन्सचेही आभार मारले. त्यानंतर भारताने वर्ल्ड कपची ट्रॉफी देखील उंचावली होती. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानास्पद होता.
advertisement
🇮🇳🤝🇿🇦
Mutual respect. Pure cricketing spirit. 💙💚#INDWvsSAW #WomensWorldCup2025 #CWC2025 #CWC25 pic.twitter.com/8Bah4YJUYe
— TTM - Truth That Matters (@TTMUpdate) November 2, 2025
दरम्यान या सर्वात पराभूत झालेली दक्षिण आफ्रीका टीम एका कोपऱ्यात बसून होती.टीम इंडियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या दिशेने जात पहिल्यांदा त्यांच्याशी शेकहॅड केले त्यानंतर गळाभेट घेतली.या संदर्भातला व्हिडिओद देखील समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये मेरीजन केपची गळाभेट जेमीमा रॉड्रीक्ससह राधा यादव घेताना दिसते आहे. त्याच्यानंतर हरमनप्रीत कौर आफ्रिकन कर्णघार वोव्हार्ल्डशी चर्चा करताना दिसत आहे.त्यामुळे एकंदरीत भारतीय संघाने आफ्रिकन संघाला पराभवानंतर धीर दिला आहे.
advertisement
कसा रंगला सामना
भारताने दिलेल्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेकडून कर्णधार लौरा व्होल्वार्ड एकटीच लढत होती.या दरम्यान तिने आपले शतकही पुर्ण केले होते. त्यानंतर ती आफ्रिकेला सामना जिंकून देईल असे वाटत असताना तिची विकेट पडली. दिप्ती शर्माच्या बॉलवर व्होल्वार्डने मोठा शॉर्ट खेळला होता.हा बॉल इतका उंचावर होता की कॅच पकडणे खूपच अवघड होते. पण अमनज्योतने पहिल्या प्रयत्नात बॉल पकडतान उडाला, दुसऱ्यांदाही तेच झालं पण तिसऱ्यांदा तिने कॅच पडकली आणि भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारी व्होल्वार्ड 101 धावांवर आऊट झाली. ही कॅच घेताच अख्खी मॅच फिरली.आणि टीम इंडियात झटपट उरलेले विकेट काढत आफ्रिकेला 246 वर ऑलआऊट करत 52 धावांनी सामना जिंकला.
advertisement
प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधाना आणि शेफाली वर्माने चांगली सूरूवात केली होती.दोन्ही खेळाडूंनी यावेळी 100 धावांची पार्टनरशीप केली होती. अशाप्रकारे वर्ल्ड कपमध्ये शतकीय भागिदारी करणारा ही पहिलीच जोडी ठरली होती.त्यावेळी दोन्हीही खेळाडू अर्धशतकाच्या नजीक होत्या. मात्र त्याच दरम्यान स्मृतीच्या बॅटीला कड लागली होती,त्यामुळे बॉल थेट विकेटकिपरच्या हातात गेला होता. अशाप्रकारे स्मृती मानधना 58 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाली होती.या खेळीत तिने 8 चौकार लगावले होते.
advertisement
दरम्यान स्मृती बाद झाल्यानंतर जेमीमा रॉड्रीक्स मैदानात आली आहे. त्यानंतर शफाली वर्माने देखील आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. त्यानंतर ती वेगाने शतकाच्या दिशेने चालली होती. मात्र त्याच दरम्यान 87 धावांवर ती आऊट झाली. या खेळीत तिने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.यानंतर शफालीच्या मागोमाग जेमीमा रॉड्रीक्स देखील 24 धावांवर बाद झाली आहे. तिच्या पाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौर देखील 20 धावांवर बाद झाली.
advertisement
त्यानंतर दिप्ती शर्माने भारताचा डाव सावरत 58 धावांची खेळी केली. आणि तिला शेवटच्या क्षणी रिचा घोषणे 34 धावांची चांगली साथ दिली.अशाप्रकारे भारताने 7 विकेट गमावून 298 धावा केल्या होत्या. साऊथ आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाने 3, नोनकुलुलोको, नदीन डी क्लर्क आणि ट्रायनने प्रत्येकी 1-1 विकेट काढली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 2:27 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : शेकहँड केला, कडकडून मिठी मारली, पराभवानंतर साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय संघाने दिला धीर


