Amanjot Kaur : वर्ल्ड कप फायनल फिरवल्यानंतर प्रेमाची मिठी, अमनजोतचा स्टेडियममध्ये कुणाला इशारा, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने महिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. भारताच्या महिला टीमला पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला आहे.
नवी मुंबई : टीम इंडियाने महिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. भारताच्या महिला टीमला पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला आहे. फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेलं 299 रनचं आव्हान पार करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 45.3 ओव्हरमध्येच 246 रनवर ऑलआऊट झाला. दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा भारताच्या या ऐतिहासिक विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
दीप्ती शर्माने आधी अर्धशतक केल्यानंतर 5 विकेटही घेतल्या. तर शफाली वर्माने 87 रनची खेळी करून 2 विकेट मिळवल्या. या ऑलराऊंड कामगिरीबद्दल शफाली वर्माला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. दीप्ती आणि शफालीशिवाय अमनजोत कौरने फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
Caption is in the video #AaliRe #CWC25 #INDvSA | Amanjot Kaur pic.twitter.com/SbeYBWqoWp
— Mumbai Indians (@mipaltan) November 2, 2025
advertisement
लॉरा वोलव्हार्डट आणि तझमिन ब्रिट्स या ओपनरनी दक्षिण आफ्रिकेला 51 रनची सुरूवात करून दिली, पण अमनजोतने डायरेक्ट हिटने तझमिन ब्रिट्सला रन आऊट केलं, ज्यामुळे भारताला पहिलं यश मिळालं. यानंतर अमनजोतने धोकादायक लॉरा वोलव्हार्डटचा भन्नाट कॅच पकडला. अमनजोतच्या हातातून दोन वेळा बॉल सुटला, पण तिसऱ्या प्रयत्नात तिने डाईव्ह मारून कॅच पकडला.
advertisement
मॅच संपल्यानंतर अमनजोत कौरने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना उद्देशून अमनजोतने मिठी मारण्याचा इशारा केला. अमनजोतचा हा इशारा नेमका कुणासाठी होता? प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कुणाला अमनजोतने मिठी मारली? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. अमनजोतच्या मिठीच्या इशाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
November 03, 2025 2:03 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Amanjot Kaur : वर्ल्ड कप फायनल फिरवल्यानंतर प्रेमाची मिठी, अमनजोतचा स्टेडियममध्ये कुणाला इशारा, Video


