Rohit Sharma : हरमनच्या शेवटच्या कॅचनंतर रोहित उभा राहिला अन्... वर्ल्ड कप जिंकल्याक्षणी हिटमॅननं काय केलं? स्टेडियममधला Video

Last Updated:

महिला वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने नवा इतिहास घडवला आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 रननी पराभव केला आहे.

हरमनच्या शेवटच्या कॅचनंतर रोहित उभा राहिला अन्... वर्ल्ड कप जिंकल्याक्षणी हिटमॅननं काय केलं? स्टेडियममधला Video
हरमनच्या शेवटच्या कॅचनंतर रोहित उभा राहिला अन्... वर्ल्ड कप जिंकल्याक्षणी हिटमॅननं काय केलं? स्टेडियममधला Video
नवी मुंबई : महिला वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने नवा इतिहास घडवला आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 रननी पराभव केला आहे, याचसोबत भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. भारताने दिलेलं 299 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 45.3 ओव्हरमध्ये 246 रनवर ऑलआऊट झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या नदिने डे क्लर्कचा कॅच हरमनप्रीतने दीप्ती शर्माच्या बॉलिंगवर पकडला आणि टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली ही फायनल पाहण्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. शेवटचा कॅच पकडण्यासाठी हरमनप्रीत धावली तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेला रोहित शर्मा त्याच्या जागेवरून उठला आणि त्याने आकाशाकडे पाहिलं. टीम इंडिया चॅम्पियन झाल्याचं कळताच रोहितनेही कोट्यवधी भारतीय चाहत्यांप्रमाणेच एकच जल्लोष केला.
advertisement
दीप्ती शर्मा भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली. आधी बॅटिंग करताना दीप्तीने 58 बॉलमध्ये 58 रनची खेळी केली, यानंतर तिने बॉलिंगमध्येही धमाका केला. 9.3 ओव्हरमध्ये 39 रन देऊन तिने 5 विकेट घेतल्या. दीप्ती शर्माशिवाय शफाली वर्मानेही उत्कृष्ट कामगिरी केली. ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या शफालीने 87 रनची मॅच विनिंग खेळी केली, त्यानंतर तिने 2 विकेटही घेतल्या. या कामगिरीबद्दल तिला शफालीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वॉलवार्डटने 98 बॉलमध्ये 101 रन केले, पण लॉराशिवाय कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.
advertisement
दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. दीप्तीने या वर्ल्ड कपच्या 7 इनिंगमध्ये 215 रन केल्या. ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. याचसोबत दीप्तीने वर्ल्ड कपमध्ये 22 विकेट घेतल्या. दीप्ती शर्मा स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली. एका वनडे वर्ल्ड कपमध्ये 200 पेक्षा जास्त रन करणारी आणि 15 विकेट घेणारी दीप्ती शर्मा पहिली खेळाडू ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : हरमनच्या शेवटच्या कॅचनंतर रोहित उभा राहिला अन्... वर्ल्ड कप जिंकल्याक्षणी हिटमॅननं काय केलं? स्टेडियममधला Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement