World Cup तोंडावर असताना BCCI कडून मोठी चूक, असंच सूरू राहिल ट्रॉफी हातातून जाणार?

Last Updated:

बीसीसीआयकडून मोठी चूक घडली आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयची ही चूक टीम इंडियाच्या हातची वर्ल्ड कप ट्रॉफी हिसकावू शकते. त्यामुळे बीसीसीआयने केलेली ही चूक आहे तरी काय? हे जाणून घेऊयात.

ind vs sa t20
ind vs sa t20
India vs South Africa : टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिकेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळते आहे.या मालिकेला टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीच्या दृष्टीने खूप महत्व आहे. कारण भारताकडे आता फक्त 7 टी सामने उरले आहेत.या 7 सामन्यात भारताला वर्ल्ड कपची तयारी करता येणार आहे. पण या दरम्यान बीसीसीआयकडून मोठी चूक घडली आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयची ही चूक टीम इंडियाच्या हातची वर्ल्ड कप ट्रॉफी हिसकावू शकते. त्यामुळे बीसीसीआयने केलेली ही चूक आहे तरी काय? हे जाणून घेऊयात.
खरं तर टी20 वर्ल्ड कप 2026 ला येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेला अजून जवळपास एक महिना उरला आहे.त्यामुळे सर्वच संघ मैदानात कसून सराव करतायत. टीम इंडियाजवळ या स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी 10 सामने होते. त्यातले तीन सामने पार पडले आहे. आज चौथा सामना आहे. पण अद्याप या सामन्याला सूरूवात झाली नाही आहे. या सगळ्या गोष्टीला बीसीसीआय कारणीभूत ठरली आहे.
advertisement
लखनऊमध्ये थंडीच्या महिन्यात दाट धुके असतात याची कल्पना बीसीसीआयला होती. तरी देखील थंडीच्या महिन्यात लखनऊमध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनामुळे लखनऊच्या मैदानात सध्या प्रचंड धुके आहेत.समोरून येणारा माणूस देखील दिसणार नाही अशी परिस्थिती आहे.त्यामुळे साधारण तीन वेळा सामन्याच्या टॉसची वेळ बदलण्यात आली होती. अजूनही सामना सूरू होईल की नाही याची शक्यता कमी आहे. यासोबत धरमशालामध्ये तिसरा टी20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात देखील खूप समस्या होत्या. थंडीचे दिवस होते आणि हिमाचलमध्ये सामना खेळवण्यात आला आणि तो यशस्वी पार पडला, पण लखनऊमध्ये तशी अजिबात परिस्थिती नाही. त्यामुळे वर्ल्ड कपच्या तोंडावर बीसीसीआयकडून मोठी चूक घडली आहे.
advertisement
बीसीसीआयच्या या चुकीमुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपची तयारी करण्यास प्रचंड त्रास झाला. त्यात टीम इंडियाकडे टी20 वर्ल्ड कपचे संयूक्त यजमानपद आहे.जर अशीच चूक बोर्डाकडून पुढे घडली तरी प्रचंड महागात पडू शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup तोंडावर असताना BCCI कडून मोठी चूक, असंच सूरू राहिल ट्रॉफी हातातून जाणार?
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement