IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज टेस्ट सीरिज 2 ऑक्टोबरपासून, कुठे पाहता येणार Live मॅच? आताच जाणून घ्या

Last Updated:

India vs West Indies Test Series भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला गुरूवार 2 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे.

भारत-वेस्ट इंडिज टेस्ट सीरिज 2 ऑक्टोबरपासून, कुठे पाहता येणार Live मॅच? आताच जाणून घ्या
भारत-वेस्ट इंडिज टेस्ट सीरिज 2 ऑक्टोबरपासून, कुठे पाहता येणार Live मॅच? आताच जाणून घ्या
अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला गुरूवार 2 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. भारतीय टीमचा 2025-26 चा घरचा मोसमही या सीरिजपासून सुरू होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे, त्यामुळे या सीरिजमध्ये विजय मिळवून अव्वल स्थान गाठण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिज या क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजला अजून यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली पहिली टेस्ट 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. तर दुसरी टेस्ट 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होईल. या दोन्ही टेस्ट भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहेत.

भारत-वेस्ट इंडिजचं हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 100 टेस्ट मॅच झाल्या आहेत, यातल्या 30 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा तर 23 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आणि 47 सामने ड्रॉ झाले. या सीरिजमध्ये टीम इंडिया विजयाची प्रमुख दावेदार असेल. याआधी झालेल्या इंग्लंड सीरिजमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवली होती.
advertisement

भारतीय टीम

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीशन (विकेट कीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव

वेस्ट इंडिजची टीम

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलोन अंडरसन, एलिक अथेन्स, जॉन कॅम्पबेल, टेगनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रीव्हस, शाय होप, तेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, ब्रॅन्डन किंग, अंडरसन फिलीप, खेरी पीयर, जेडेन सील्स
advertisement

कुणे पाहता येणार सामना?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचची सीरिज स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दिसणार आहे, तर मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर पाहता येईल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज टेस्ट सीरिज 2 ऑक्टोबरपासून, कुठे पाहता येणार Live मॅच? आताच जाणून घ्या
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement