IND vs WI : ती विराटची फॅन, तो रोहितचा! अहमदाबाद टेस्टमधील भावा-बहिणीचा क्युट Video व्हायरल

Last Updated:

IND vs WI Brother sister Cute Video : दोन्ही भावंडांनी टीम इंडियाच्या टेस्ट व्हाईट-बॉल फॉरमॅटच्या जर्सी घातल्या होत्या, ज्यांच्या पाठीवर विराट आणि रोहित या दोन लेजंड्सची नावं होती.

IND vs WI Brother sister Cute Video
IND vs WI Brother sister Cute Video
Ahmadabad Test Cute Video : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी एक क्युट मुव्हमेंट कॅमेरामध्ये कैद झाला. सामन्याची 17 वी ओव्हर सुरू असताना केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत होते. टीम इंडियाने 51 धावा करून चांगली सुरूवात केली होती. अशातच स्टेडियमवरचा एक व्हिडीओ समोर आला अन् अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

विराट आणि रोहितचे चिमुकले फॅन्स

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या लहान मुलीने विराट कोहलीच्या नावाचा आणि जर्सी नंबर 18 चा टी-शर्ट घातला होता, तर तिच्या भावाने रोहित शर्माच्या नावाचा आणि नंबर 45 चा टी-शर्ट घातला होता. या दोन्ही भावंडांनी टीम इंडियाच्या टेस्ट व्हाईट-बॉल (White-Ball) फॉरमॅटच्या जर्सी घातल्या होत्या, ज्यांच्या पाठीवर विराट आणि रोहित या दोन लेजंड्सची नावं होती. ही दोघं स्टेडियममध्ये मस्ती करताना दिसले. याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement

पाहा Video

पहिल्या दिवसाचा खेळ

टॉस जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने (Roston Chase) प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय बॉलर्सनी हा निर्णय चुकीचा ठरवला. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) भेदक बॉलिंग करत 4 विकेट्स घेतल्या. त्याला जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) उत्तम साथ दिली, ज्याने 3 विकेट्स घेतल्या. फिरकी बॉलर्सपैकी कुलदीप यादवने 2 विकेट्स आणि वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 1 विकेट घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजचा डाव 162 धावांवर गडगडला.
advertisement
वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक रन जस्टिन ग्रीव्ह्सने (Justin Greaves) 32 रन केले. रोस्टन चेसने 24 रन आणि शाई होपने (Shai Hope) 26 रन चे योगदान दिलं. वेस्ट इंडिजचा डाव लवकर संपल्यानंतर भारताने आत्मविश्वासाने सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल मोठी इनिंग खेळू न शकल्याने केएल राहुल (KL Rahul) एक बाजू सांभाळून उभा राहिला आणि त्याने शानदार 53 रन (नॉट आऊट) करत आपले अर्धशतक पूर्ण केलं.
advertisement
दरम्यान, यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 68 रनची भागीदारी केली. जयस्वाल 36 रन करून आऊट झाला, तर साई सुदर्शन (Sai Sudharsan) केवळ 7 रन करून माघारी परतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) 18 रन (नॉट आऊट) सह केएल राहुल क्रीझवर होता.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : ती विराटची फॅन, तो रोहितचा! अहमदाबाद टेस्टमधील भावा-बहिणीचा क्युट Video व्हायरल
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement