IPL 2024 : धोनीच्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सही गहिवरली, PHOTO पाहून फॅन्सही भारावले

Last Updated:

चेन्नई सुपरकिंग्सने त्यांचा कर्णधार बदलल्यावर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

आयपीएल 2024
आयपीएल 2024
मुंबई : आयपीएल 2024 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना चेन्नई सुपरकिंग्सने कर्णधार बदलण्याविषयी मोठी घोषणा केली आहे. एम एस धोनीने चेन्नई सुपरकिंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्सने त्यांचा कर्णधार बदलल्यावर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा माजी कर्णधार एम एस धोनी यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना मुंबई इंडियन्सने 'इन्फिनिटी' चा इमोजी दिला आहे. मुंबई इंडियन्सने देखील आयपीएल 2024 साठी संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवले आहे. त्यामुळे यंदा आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरतील.
advertisement
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतल्यावर फ्रेंचायझीला रोहित आणि मुंबईच्या फॅन्सचा मोठा रोष सहन करावा लागला होता. अनेकांनी मुंबई इंडियन्सच्या टोप्या, टी शर्ट्स जाळून याचा निषेध व्यक्त केला होता. परंतु भविष्याचा विचार करून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवले असल्याचे मुंबईकडून वारंवार सांगण्यात आले होते. आता धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्सने देखील कुठेतरी भविष्याचा विचार करून नेतृत्व युवा खेळाडूच्या हाती सोपवले आहे.
advertisement
मुंबई इंडियन्सच्या या पोस्ट खाली चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले "हा क्रिकेटमधील एका युगाचा शेवट", तर एकाने लिहिले "दोन हिरो एकाच फ्रेममध्ये आम्ही या रायव्हलरीला मिस करू"
advertisement
मुंबई इंडियन्स :
24 मार्च - रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - अहमदाबाद
27 मार्च - बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद - हैद्राबाद
1 एप्रिल - सोमवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - मुंबई
7 एप्रिल - रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- मुंबई
चेन्नई सुपरकिंग्स : 
22 मार्च - शुक्रवार- चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - चेन्नई
advertisement
26 मार्च - मंगळवार- चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स - चेन्नई
31 मार्च- रविवार - चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - विशाखापट्टणम
5 एप्रिल- शुक्रवार- चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद - हैद्राबाद
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : धोनीच्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सही गहिवरली, PHOTO पाहून फॅन्सही भारावले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement