IPL 2025 : मनात वेदनांचा डोंगर, आई रुग्णालयात; काळजावर दगड ठेवून मैदानात उतरला अन् 300 च्या स्ट्राईक रेटने धुतलं!

Last Updated:

Abdul Samad Mother at delhi hospital : लखनऊ सुपर जाएन्टसचा स्टार क्रिकेटर अब्दुल समद राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीच्या हॉस्पिटलमधून थेट क्रिझवर उतरला होता.

IPL 2025 Abdul Samad Mother at delhi hospital
IPL 2025 Abdul Samad Mother at delhi hospital
IPL 2025 Abdul Samad : आयपीएलचे सामने एवढ्या लवकर संपतात की, मॅच जिंकवणाराच खेळाडू सर्वांच्या लक्षात राहतो. पण लहान लहान खेळी करणारे फलंदाज कुणाच्याच लक्षात राहत नाहीत. राजस्थान आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यानंतर सर्वांना आवेश खानच्या शेवटच्या ओव्हरचं कौतूक केलं. पण लखनऊला खरा सामना खेचून आणला तो जम्मू काश्मीरच्या अब्दुल समद याने... जेव्हा जेव्हा लखनऊला गरज असते तेव्हा तेव्हा अब्दुल समद याने अफलातून कामगिरी करत लखनऊची लाज राखली आहे. विशेषत: जेव्हा ऋषभ पंत लवकर आऊट झालाय, तेव्हा अब्दुल समदने लखनऊला नेहमी जीवदान दिलंय. मात्र, राजस्थानपूर्वीच्या सामन्यात मोठी घटना घडली होती.

अब्दुल समदचे वडील भावूक

अब्दुल समद खेळाच्या काही तास आधी जयपूरला पोहोचला होता. हे फार कमी लोकांना माहिती असेल कारण त्याच्या आईला पाठीच्या दुखापतीमुळे नवी दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. समदचे वडील मोहम्मद फारूक यांनी संकटाच्या वेळी मानसिक खंबीरपणा दाखवल्याबद्दल आपल्या मुलाचे कौतुक केलं. मला माझ्या मुलाच्या कामगिरीचा खरोखर अभिमान आहे, असं मोहम्मद फारूक यांनी म्हटलं आहे.
advertisement

काही मिनिटआधी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला

माझ्या पत्नीची तब्येत ठीक नसल्याने, संघ व्यवस्थापनाकडून परवानगी मिळाल्यानंतर समद काही दिवस तिच्यासोबत होता. सामन्याच्या अगदी आधी तो जयपूरला गेला आणि चांगली खेळी केली. संदीप शर्मासारख्या अनुभवी गोलंदाजाविरुद्ध चार षटकार मारणे सोपं काम नाही. मला आशा आहे की समद उर्वरित सामन्यांमध्ये अशाच खेळी करत राहील, असं अब्दुल समदचे वडील मोहम्मद फारूक यांनी म्हटलं आहे.
advertisement

कोण आहे अब्दुल समद?

आयपीएल 18 मध्ये बहुतेकांच्या नजरा स्फोटक फलंदाज अब्दुल समदवर असतील. 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात करणारा रसिक यावेळी लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसतोय. मुळचा जम्मू काश्मीरचा असलेला अब्दुल समद त्याच्या आक्रमक खेळीसाठी चर्चेत असतो. समदने आतापर्यंत 50 आयपीएल सामन्यांमध्ये 577 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 146 आहे. समद जलद धावा काढण्यासाठी आणि स्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : मनात वेदनांचा डोंगर, आई रुग्णालयात; काळजावर दगड ठेवून मैदानात उतरला अन् 300 च्या स्ट्राईक रेटने धुतलं!
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement