IPL 2025 : कॅप्टन बदलला अन् KKR ने मॅच जिंकली, शाहरुख खान करणार Ajinkya Rahane चा टांगा पटली?

Last Updated:

Ajinkya Rahane KKR Captaincy : दिल्लीविरुद्घ सुनील नरेनने केकेआरला विजय मिळवून देताच आता अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

Ajinkya Rahane KKR Captaincy
Ajinkya Rahane KKR Captaincy
KKR vs DC : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएल 2025 च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांनी अविश्वसनीय कमबॅक करत दिल्ली कॅपिटल्सला (DC) पराभूत केलं. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने 13.1 ओव्हरमध्ये 3 बाद 136 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, कॅप्टन बदलला आणि केकेआरचं चित्र पालटलं. त्यानंतर केकेआरच्या गोलंदाजांनी जोरदार पकड घेतली आणि दिल्लीला उर्वरित 6.5 ओव्हरमध्ये केवळ 54 धावा करता आल्या, तसेच त्यांनी 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे आता सोशल मीडियावर अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर (Ajinkya Rahane KKR Captaincy) प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

कॅप्टन बदलला अन् मॅच फिरली

दिल्लीसाठी फलंदाजी करत असलेला अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे अचानक दुखापतग्रस्त (Ajinkya Rahane Injury Update) झाला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. त्यामुळे उर्वरित सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फिरकीपटू सुनील नरेनला दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची भूमिका घ्यावी लागली. सुनील नरेन कॅप्टन म्हणून मैदानात आला अन् त्याने फिरकीच्या जोरावर दिल्लीचा किल्ला उद्वस्त केला. दिल्लीला पुढच्या 7 ओव्हरमध्ये स्पिनर्सच्या आक्रमणामुळे काहीही हालचाल करु दिली नाही अन् नरेनने सामना जिंकवला.
advertisement

केकेआरचं काय चुकतंय?

सुनील नरेनच्या अफलातून कॅप्टन्सीमुळे आता अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर समालोचकांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रेयस अय्यरनंतर केकेआरने सुनील नरेनचा विचार करायला हवा होता का? असा सवाल आकाश चोप्राने (Akash chopra On KKR captaincy) लाईव्ह कॉमेन्ट्री करताना विचारला होता. तसेच आता कोलकातापासून ते सोशल मीडियापर्यंत केकेआरच्या कॅप्टन्सीवर चर्चा होताना दिसत आहे.
advertisement

केकेआरचं वरुणास्त्र

दरम्यान, केकेआरच्या गोलंदाजांनी शेवटच्या ओव्हरमध्ये भेदक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवले. आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी निर्णायक क्षणी महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांना या दबावाचा सामना करता आला नाही आणि नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : कॅप्टन बदलला अन् KKR ने मॅच जिंकली, शाहरुख खान करणार Ajinkya Rahane चा टांगा पटली?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement