CSK मध्ये भूकंप, शेवटचा क्रमांक पाहून मालक संतापले, 5 खेळाडूंना शाल-श्रीफळ देऊन घरी पाठवणार!

Last Updated:

पाच वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल 2025 ची कामगिरी निराशाजनक झाली. संपूर्ण हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या बॉलिंग आणि बॅटिंगला संघर्ष करावा लागला.

CSK मध्ये भूकंप, शेवटचा क्रमांक पाहून मालक संतापले, 5 खेळाडूंना शाल-श्रीफळ देऊन घरी पाठवणार!
CSK मध्ये भूकंप, शेवटचा क्रमांक पाहून मालक संतापले, 5 खेळाडूंना शाल-श्रीफळ देऊन घरी पाठवणार!
मुंबई : पाच वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल 2025 ची कामगिरी निराशाजनक झाली. संपूर्ण हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या बॉलिंग आणि बॅटिंगला संघर्ष करावा लागला, त्यामुळे सीएसकेला हंगामात 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. या निराशाजनक कामगिरीमुळे, सीएसके आता पुढील हंगामासाठी आपल्या टीममध्ये काही मोठे बदल करू शकते.

अश्विनचा पत्ता कट

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी अश्विनला 9.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण त्याची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2025 मध्ये, अश्विनने सीएसकेसाठी एकूण 9 सामने खेळले, ज्यामध्ये तो फक्त 7 विकेट घेऊ शकला. त्याच वेळी, त्याने बॅटिंगमध्येही फक्त 33 रन केल्या.

डेवॉन कॉनवेकडूनही निराशा

सीएसकेने लिलावामध्ये न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवेला 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण यंदाच्या मोसमात कॉनवेने सीएसकेला चांगली सुरूवात करून दिली नाही. आयपीएल 2025 मध्ये कॉनवे 6 सामने खेळला ज्यात तो फक्त 156 रन करू शकला.
advertisement

विजय शंकरलाही डच्चू

ऑलराऊंडर विजय शंकर यालाही सीएसके पुढच्या मोसमात डच्चू देऊ शकते. सीएसकेने विजय शंकरसाठी 1.2 कोटी रुपये मोजले होते, पण त्याला संपूर्ण मोसमात चमक दाखवता आली नाही. यंदाच्या मोसमात विजय शंकर 6 सामने खेळला, ज्यात त्याला फक्त 118 रन करता आल्या.

मुकेश चौधरीचं स्थानही धोक्यात

सीएसके पुढील हंगामात फास्ट बॉलर मुकेश चौधरीलाही रिलीज करू शकते. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु तो त्या पूर्ण करू शकला नाही. मुकेश चौधरीने 18 व्या हंगामात सीएसकेसाठी एकूण 2 सामने खेळले, ज्यामध्ये त्याला फक्त 1 बळी मिळाला.
advertisement

दीपक हुडावरही टांगती तलवार

दीपक हुडाचाही या यादीत समावेश होऊ शकतो. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणाऱ्या दीपक हुडासाठी हा हंगाम खूप वाईट होता. दीपक हुडाने सीएसकेसाठी एकूण 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने फक्त 32 रन केल्या. सीएसकेने 1.7 कोटी रुपये खर्च करून दीपक हुडाला टीममध्ये घेतले, पण आता सीएसके पुढच्या मोसमात दीपक हुडापेक्षा चांगला पर्याय शोधू शकते.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK मध्ये भूकंप, शेवटचा क्रमांक पाहून मालक संतापले, 5 खेळाडूंना शाल-श्रीफळ देऊन घरी पाठवणार!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement