IPL 2025 : पावसासोबत आयपीएल जिंकण्याचं स्वप्नही बुडालं, प्ले-ऑफच्या रेसमधून तिसरी टीम बाहेर
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. याचसोबत हैदराबादचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.
हैदराबाद : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. याचसोबत हैदराबादचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर हैदराबाद प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झालेली तिसरी टीम बनली आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबादला त्यांचे उरलेले चारही सामने जिंकावे लागणार होते, पण दिल्लीविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही टीमना 1-1 पॉईंट मिळाला.
हैदराबादच्या हातातली मॅच गेली
या सामन्यामध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पॅट कमिन्सने सुरूवातीपासूनच दिल्लीला धक्के दिले, त्यामुळे दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 133 रनच करता आले. हैदराबादकडून पॅट कमिन्सला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, याशिवाय जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि इशान मलिंगा यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी प्रत्येकी 41-41 रन केल्या.
advertisement
दिल्ली अजूनही रेसमध्ये
हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीला फक्त 133 रन करता आल्या, त्यामुळे दिल्लीचा पराभव निश्चित मानला जात होता. पण पाऊस दिल्लीच्या मदतीला धावला आणि त्यांच प्ले-ऑफमधलं स्थान कायम राहिलं. दिल्लीने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले असून 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर हैदराबादविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे त्यांच्या खात्यात 13 पॉईंट्स झाले आहेत.
Location :
Hyderabad,Telangana
First Published :
May 05, 2025 11:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : पावसासोबत आयपीएल जिंकण्याचं स्वप्नही बुडालं, प्ले-ऑफच्या रेसमधून तिसरी टीम बाहेर