IPL Auction 2026 : धोनीच्या CSKने पाण्यासारखा पैसा ओतला,12 मिनिटात 29 कोटी उडवले, अनकॅप खेळाडूंवर लावला जुगार

Last Updated:

महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या या लिलावात 12 मिनिटात पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. चेन्नईने 12 मिनिटात 28.40 कोटी पैसा खर्च केला आहे.हा पैसा खर्च करून त्यांनी दोन अनकॅप खेळाडूंना ताफ्यात घेतलं आहे.

mahendra singh dhoni
mahendra singh dhoni
IPL Auction 2026 : आयपीएल 2026 च्या मिनी लिलाव दुबईत सूरू आहे. या लिलावात नवखे खेळाडुंवर कोटींची बोली लागते आहे. तर स्टार खेळाडूंच्या तोंडाला पानं पुसली जात आहे.त्यात महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या या लिलावात 12 मिनिटात पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. चेन्नईने 12 मिनिटात 28.40 कोटी पैसा खर्च केला आहे.हा पैसा खर्च करून त्यांनी दोन अनकॅप खेळाडूंना ताफ्यात घेतलं आहे. हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात
advertisement
खरं तर लिलावात महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने 4.56 मिनिटाला प्रशांत वीर या अनकॅप खेळाडूला 14.20 कोटीला ताफ्यात घेतल. त्यानंतर 5.08 मिनिटाला चेन्नई सुपर किंग्जने कार्तिक शर्मा या खेळाडूला 14.20 कोटीला संघात घेतलं.अशाप्रकारे चेन्नईने 12 मिनिटात 28.40 कोटी रूपये खर्च केले होते.
advertisement
कोण आहे प्रशांत वीर?
आपल्या छोट्या करिअरमध्ये प्रशांतने पॉवर हिटिंग आणि डावखुऱ्या स्पिन बॉलिंगने अनेकांना प्रभावित केलं. रवींद्र जडेजाला रिलीज केल्यानंतर सीएसकेला त्याचासारखाच हिटर आणि डावखुरा स्पिनर हवा होता, त्यामुळे त्यांनी प्रशांत वीरसाठी पैशांचा पाऊस पाडला. प्रशांत वीर हा सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे, जिथे त्याने 7 सामन्यांमध्ये 169.19 च्या स्ट्राईक रेटने 37.33 च्या सरासरीने 112 रन केले, त्याचा सर्वोत्तम स्कोअर बिहारविरुद्ध नाबाद 40 रन होता.बॉलिंगमध्येही प्रशांत वीरने उत्कृष्ट कामगिरी केली. 7 इनिंगमध्ये त्याने 6.76 चा इकोनॉमी रेट आणि 18.77 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या. आयपीएल लिलावासाठी प्रशांतची बेस प्राईज 30 लाख रुपये होती.
advertisement
कार्तिक शर्मा कोण? 
कार्तिक शर्मा राजस्थानकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. वादळी स्ट्राईक रेट आणि मोठे शॉट्स मारण्यासाठी कार्तिक शर्मा ओळखला जातो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये राजस्थानकडून खेळताना कार्तिकने 5 सामन्यांमध्ये 160 च्या स्ट्राईक रेटने 133 रन केले आहेत. खालच्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन कार्तिक मोठे शॉट्स मारून फिनिशरची भूमिका निभावतो.
advertisement
कार्तिक शर्माने राजस्थानकडून खेळताना अंडर-14 आणि अंडर-16 मध्येही नाव कमावलं. टी-20 करिअरमध्ये कार्तिकने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 334 रन केले आहेत, यात त्याचा स्ट्राईक रेट 163 च्या आसपास आहे. कार्तिक विकेट कीपरसोबतच पॉवर हिटरही आहे, त्यामुळे तो सीएसकेसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : धोनीच्या CSKने पाण्यासारखा पैसा ओतला,12 मिनिटात 29 कोटी उडवले, अनकॅप खेळाडूंवर लावला जुगार
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement