IPL Commentaryमधून हकालपट्टी विराट-रोहितमुळे नव्हे, इरफान पठाणचा स्फोटक खुलासा; पडद्यामागची खरी गोष्ट उघड

Last Updated:

Irfan Pathan: IPLच्या कमेंट्री पॅनेलमधून अचानक हकालपट्टी का झाली यावर चाहत्यांमध्ये अनेक तर्कवितर्क होते. मात्र इरफान पठाणने आता स्वतःच स्फोटक खुलासा करत खरे कारण उघड केले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी ऑलराउंडर आणि सध्या समालोचक असलेल्या इरफान पठाणच्या कठोर टीकेमुळे काही खेळाडू नाराज असल्याची चर्चा होती. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान इरफानने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर टीका केल्यामुळे त्याला आयपीएलच्या प्रसारण संघातून (broadcast team) काढून टाकण्यात आले, असे वृत्त होते.
मात्र इरफान पठाणने आता याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या मते विराट कोहली किंवा रोहित शर्मा नाही, तर भारतीय संघातील आणखी एक वरिष्ठ खेळाडू म्हणजेच हार्दिक पांड्या त्याच्या टीका टिप्पणीमुळे नाराज होता.
इरफान पठाणचा खुलासा
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत इरफानने याबाबतचा खुलासा केला. समालोचक म्हणून त्याच्या भूमिकेनुसार हार्दिकबद्दल केलेली टीका फारशी कठोर नव्हती. जर मी 14 पैकी 7 सामन्यांमध्ये तुमच्यावर टीका करत असेल, तर मी अजूनही कठोर टीका केलेली नाही. समालोचक म्हणून हे आमचे काम आहे, असे त्याने मुलाखतीत सांगितले.
advertisement
इरफानने त्यांच्यात कोणतीही वैयक्तिक मतभेद किंवा स्पर्धा नसल्याचे म्हटले. तसेच त्याने बडोद्याच्या (Baroda) क्रिकेटपटूंना नेहमीच पाठिंबा दिल्याचे सांगितले. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. दीपक हुडा, कृणाल पांड्या किंवा हार्दिक पांड्या- माझ्या नंतर जेवढे खेळाडू बडोद्यातून आले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही असे म्हणू शकत नाही की इरफान-युसूफने त्यांना मदत केली नाही, असे इरफानने सांगितले.
advertisement
 हार्दिकला पाठिंबा 
हार्दिकला यापूर्वी दिलेल्या पाठिंब्याचे उदाहरण देताना इरफानने 2012 मधील एक घटना आठवली. तेव्हा त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाला (Sunrisers Hyderabad) तरुण हार्दिक पांड्याची शिफारस केली होती. इरफानच्या मते व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने (VVS Laxman) नंतर कबूल केले होते की त्यावेळी इरफानचा सल्ला न ऐकल्याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला होता.
व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सवर मान्य केले की- 2012 मध्ये त्याने माझा सल्ला ऐकला नाही आणि हार्दिकला निवडले नाही, ही त्याची चूक होती. जर त्याने तेव्हा हार्दिकला निवडले असते, तर तो हैदराबादकडून खेळला असता, असे इरफानने सांगितले.
advertisement
advertisement
इरफानने पुढे हे देखील स्पष्ट केले की- सार्वजनिक टीकेच्या वेळीही त्याने हार्दिकचा बचाव केला होता. आयपीएल 2024 च्या आधी रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यानंतर हार्दिकला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी त्यांची बाजू घेतली आणि सांगितले की खेळाडूबद्दल काहीही वाईट बोलू नका, असे म्हटले होते.
खेळाडूंच्या कारकिर्दीत टीका होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, असे इरफानने सांगितले. महान खेळाडू सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनाही टीकेचा सामना करावा लागल्याचे त्याने उदाहरण दिले, पण वैयक्तिक हल्ल्यांवर मात्र त्याने आक्षेप घेतला.
advertisement
खेळाडूवर टीका करणे चुकीचे नाही, जर तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला त्यातून जावे लागेल. हे सुनील गावस्कर आणि महान सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीतही घडले आहे... त्यांनी कधीही कोणाला हे जाणवू दिले नाही की ते खेळापेक्षा मोठे आहेत. पण हार्दिक पांड्याबद्दल वापरल्या गेलेल्या अपमानास्पद शब्दांच्या मी विरोधात आहे, असे तो म्हणाला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Commentaryमधून हकालपट्टी विराट-रोहितमुळे नव्हे, इरफान पठाणचा स्फोटक खुलासा; पडद्यामागची खरी गोष्ट उघड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement