VIDEO : ज्या हातात बंदुका कोयते, त्याच हाताने धरली बॅट, जगातील सर्वात रोमहर्षक लीग; नाइट राइडर्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jail Premier League 2025 in Mathura : मथुरा तुरुंगात जेल प्रीमियर लीगमध्ये 8 संघांनी भाग घेतला होता. यामध्ये जेल प्रीमियर लीगमध्ये झालेल्या फायनलमध्ये नाईट रायडर्स संघांने दिल्ली कॅपिटलने विजय मिळवला.
Mathura Jail Premier League : एकीकडे सीमेवरील तणावामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने स्थगित करण्यात आले असताना दुसरीकडे कैद्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांचा ताण कमी करण्यासाठी मथुरा तुरुंगात जेल प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या मथुरा तुरुंगात जेल प्रीमियर लीगमध्ये 8 संघांनी भाग घेतला होता. यामध्ये जेल प्रीमियर लीगमध्ये झालेल्या फायनलमध्ये नाईट रायडर्स संघांने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करुन ट्रॉफी उंचावली आहे.
जेल प्रीमियर लीग 2025
मथुरा तुरुंगाचे अधीक्षक अंशुमन गर्ग यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, गेल्या एक महिन्यापासून मथुरा येथे जेल प्रीमियर लीग 2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात आठ संघांनी भाग घेतला होता, प्रत्येकी चार संघांना गट अ आणि गट ब मध्ये स्थान देण्यात आले होते. नाईट रायडर नावाच्या बॅरेक क्रमांक 1 आणि 2 च्या संघाने विजय मिळवला आणि विजेत्या संघाने या सामन्यात बॅरेक क्रमांक 7 आणि 8 च्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव केला.
advertisement
पाहा Video
#WATCH | Uttar Pradesh | To enhance the talent of the prisoners, improve their physical health and relieve them from mental stress, Jail Premier League was organized on the lines of IPL among the prisoners in Mathura Jail pic.twitter.com/ACofTYmRgi
— ANI (@ANI) May 15, 2025
advertisement
ऑरेंज आणि पर्पल कॅप
आयपीएलप्रमाणे जेल प्रीमियर लीग 2025 मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप देखील देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत एकूण 15 सामने आयोजित करण्यात आले होते. कैद्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी खेळ हे एक चांगले माध्यम आहे. आम्ही खेळांच्या माध्यमातून बंधुता वाढवतो. यामुळे कैद्यांमध्येही एकता दिसून येते, असं या लीगच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्ट होतं. कैदी खूप तणावाखाली असतात, अनेक वेळा त्यांना जामीन दिला जात नाही आणि काही कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटू दिलं जात नाही, त्यामुळे कैद्यांना तणावमुक्त असे प्रयोग केले जात आहेत.
advertisement
मानसिक ताणतणावापासून मुक्तता
दरम्यान, कैद्यांच्या प्रतिभेला वाव देणं, त्यांचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांना मानसिक ताणतणावापासून मुक्त करणं हे या लीगच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्ट होतं. मथुरा तुरुंगात कैद्यांमध्ये आयपीएलच्या धर्तीवर जेल प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आलं होतं.
Location :
Mathura,Uttar Pradesh
First Published :
May 15, 2025 2:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : ज्या हातात बंदुका कोयते, त्याच हाताने धरली बॅट, जगातील सर्वात रोमहर्षक लीग; नाइट राइडर्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवलं!