Jemimah Rodrigues : दाग अच्छे हैं..! जेमिमाने सेमीफायनल जिंकवली पण चर्चा मात्र गौतम गंभीरची, हेड कोचची पोस्ट व्हायरल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jemimah Rodrigue Muddied jersey : वुमेन्स इंडिया संघाने ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पाणी पाजून तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. अशातच आता जेमिमाची जर्सी पाहून अनेकांना गौतम गंभीर आठवलाय.
Jemimah Rodrigue Gautam Gambhir jersey : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला वर्ल्ड कप 2025 च्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाने डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. हा सामना वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रन चेज ठरला. टीम इंडियाने अवघड असा 339 चा रेनचेस पूर्ण केला अन् ऑस्ट्रेलियाला घाम फोडला. जेमिमा रोड्रिग्जने 134 बॉलमध्ये नाबाद 127 रनची ऐतिहासिक खेळी केली आणि वर्ल्ड कप नॉकआऊटमध्ये शतक ठोकणारी ती दुसरी भारतीय बॅटर ठरली. मात्र, जेमिमाच्या इनिंगनंतर गंभीरची चर्चा होताना दिसत आहे.
जेमिमाने अखेरपर्यंत झुंज...
पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर जेमिमा रोड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी टीमचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 167 रनची निर्णायक भागीदारी केली. जेमिमाने अखेरपर्यंत झुंज दिली. त्यामुळे जेमिमाच्या जर्सीला माती लागली होती. त्याचा फोटो व्हायरल झाला. तर दुसरीकडे टीम इंडियाचा सध्याचा हेड कोच गौतम गंभीर याचा 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमधील जर्सीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याची जर्सी देखील वर्ल्ड कप जिंकवताना अशीच मळलेली होती.
advertisement
गौतम गंभीरची सोशल मीडियावर पोस्ट
टीम इंडियाच्या विजयानंतर मेन्स टीमचा हेड कोच गौतम गंभीर याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात त्याने टीम इंडियाच्या पोरींचं कौतूक केलं. 'ते संपल्याशिवाय संपत नाही. मुलींनो खूप चांगली कामगिरी केली', असं गौतम गंभीर म्हणाला. गंभीरने देखील पोरींना कौतुकाची थाप दिली. तसेच सचिन तेंडूलकर आणि इतर दिग्ग्जांनी देखील ट्विट करत पोरींची पाठ थोपटली आहे.
advertisement
It ain’t over till it’s over! What a performance girls pic.twitter.com/Ox0Mg0hbEt
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 30, 2025
No.3 Muddied shirt Match-winning knocks written in grit pic.twitter.com/589ejmwGGP
— ICC (@ICC) October 30, 2025
advertisement
2 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकेशी फायनल
दरम्यान, जेमिमा रोड्रिग्जला तिच्या मॅच-विनिंग शतकासाठी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले. या विजयामुळे भारताचा फायनलमध्ये प्रवेश झाला असून, त्यांचा सामना आता 2 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाला लीग स्टेजमध्ये हरवलं होतं. त्याचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. जरी कोणतीही टीम जिंकली तरी देखील 25 वर्षानंतर नवी वर्ल्ड कप चॅम्पियन टीम मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 8:08 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jemimah Rodrigues : दाग अच्छे हैं..! जेमिमाने सेमीफायनल जिंकवली पण चर्चा मात्र गौतम गंभीरची, हेड कोचची पोस्ट व्हायरल


