Kapil Dev On Gautam Gambhir : 'गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच नाही', कपिल देव यांच्या वक्तव्याने बीसीसीआयमध्ये उडाली खळबळ!

Last Updated:

Kapil Dev On Indian Cricket Team Coach : खरं तर गौतम गंभीर हा कोच असूच शकत नाही, तो केवळ टीमचा मॅनेजर असू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू आधीच परिपक्व असतात, असं कपिल देव म्हणाले आहेत.

Kapil Dev On Indian Cricket Team Coach
Kapil Dev On Indian Cricket Team Coach
Kapil Dev On Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट विश्वात सध्या एका दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली असून, टीम इंडियाच्या आगामी रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारावा लागल्याने सध्या मुख्य प्रशिक्षकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका होत आहे. अशातच 1983 च्या वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव यांनी एका कार्यक्रमात आपले परखड मत मांडलं असून, त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले कपिल देव?

गौतम गंभीरच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य करताना कपिल देव म्हणाले की, सध्याच्या काळात 'कोच' हा शब्द अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. खरं तर गौतम गंभीर हा कोच असूच शकत नाही, तो केवळ टीमचा मॅनेजर असू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू आधीच परिपक्व असतात, त्यामुळे त्यांना तांत्रिक गोष्टी शिकवण्यापेक्षा त्यांचे मानसिक व्यवस्थापन करणं जास्त महत्त्वाचं असतं, असं कपिल देव म्हणाले आहेत.
advertisement

कपिल देव यांनी गंभीरचं माप काढलं?

गौतम एखादा लेग-स्पिनर किंवा विकेटकीपरला नवीन काही शिकवू शकत नाही, कारण ते आधीच त्यात पारंगत नसतो, असं म्हणत कपिल देव यांनी गंभीरचं माप काढलं का? असा सवाल विचारला जातोय. कपिल देव यांच्या या वक्तव्यानंतर आता क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बीसीसीआय देखील याचा विचार करणार का? असा सवाल विचारला जात आहे. गंभीर अंथरुणाबाहेर हातपाय पसरतोय का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
advertisement

आत्मविश्वास निर्माण करणे हेच मुख्य काम

खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हेच मुख्य काम आहे. आपल्या स्वतःच्या नेतृत्वाचा अनुभव सांगताना त्यांनी नमूद केलं की, जो खेळाडू शतक ठोकतो त्याच्यासोबत डिनरला जाण्यापेक्षा, जो फॉर्ममध्ये नाही अशा खेळाडूसोबत वेळ घालवणं जास्त गरजेचं असतंय. टीम इंडियाचे भवितव्य हे खेळाडूंच्या मनोबलावर अवलंबून असते, असंही कपिल देव यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kapil Dev On Gautam Gambhir : 'गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच नाही', कपिल देव यांच्या वक्तव्याने बीसीसीआयमध्ये उडाली खळबळ!
Next Article
advertisement
Manikrao Kokate: महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर
महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर
  • महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर

  • महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर

  • महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर

View All
advertisement