सुनील गावस्करांनी शब्द पाळला, भारताच्या स्टार खेळाडूला दिले सर्वात मोठे Surprise; मैदानाबाहेरील ‘ये दोस्ती’चा व्हिडिओ

Last Updated:

Sunil Gavaskar: काही महिन्यांपूर्वी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला शब्द दिला होता. आता गावस्करांनी तो शब्द पाळला असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

News18
News18
मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघातील स्टार खेळाडू जेमिमा रोड्रिग्ज सध्या महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून नवी जबाबदारी स्वीकारत आहे. भारताच्या वनडे वर्ल्डकप विजयात जेमिमा खास अशी भूमिका होती. जेमिमाने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये दिग्गज अशा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळून दिला होता. नेतृत्वाच्या या नव्या भूमिकेत पाऊल टाकत असतानाच, क्रिकेटच्या एका दिग्गजाकडून तिचे कौतुक झाले आहे आणि हा अविस्मरणीय क्षण तिने सर्वांसोबत शेअर केला.
advertisement
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर आणि महिला क्रिकेटमधील स्टार जेमिमा रोड्रिग्ज यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या भेटीत गावस्करांनी तिला खास भेट दिली आणि काही महिन्यांपूर्वी दिलेला शब्द देखील पूर्ण केला.
advertisement
काही महिन्यांपूर्वी गावस्करांनी मजेशीर अंदाजात सांगितलं होतं की, जेमिमाने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यास ते तिच्यासोबतजॅमकरतील. त्यानुसार भेटीदरम्यान गावस्कर यांनी जेमिमाचं मनापासून स्वागत केलं आणि खास डिझाइन केलेलीबॅट-गिटारतिच्या हाती दिली. यावेळी आज मी ओपनिंग ॅटिंग करणार नाही, असे सांगत तिलाच गिफ्ट ओपन करण्यास सांगितले.
advertisement
या भेटीचा खास क्षण ठरला तो ‘शोले’ चित्रपटातील अजरामर गीत ‘ये दोस्ती’. किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी गायलेल्या या गाण्यावर गावस्कर आणि जेमिमाने एकत्र गाणं गात चाहत्यांची मनं जिंकली. “सुनील सरांनी त्यांचं वचन पाळलं आणि आम्ही क्रिकेटमधील सगळ्यात कूलबॅट-गिटार’सोबत जॅम केलं. हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता,” असं जेमिमाने इंस्टाग्रामवर लिहिलं.
advertisement
advertisement
मैदानाबाहेर हा आनंदाचा क्षण अनुभवत असतानाच जेमिमा आता मैदानावरही नव्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) हंगामात जेमिमा दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. आतापर्यंत मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सलग तीन हंगाम (2023, 2024, 2025) उपविजेतेपद पटकावलं. जेमिमा त्या संघाची उपकर्णधार होती. मात्र आता लॅनिंग यूपी वॉरियर्सची कर्णधार झाल्याने, दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी पहिल्यांदाच जेमिमाच्या खांद्यावर आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सुनील गावस्करांनी शब्द पाळला, भारताच्या स्टार खेळाडूला दिले सर्वात मोठे Surprise; मैदानाबाहेरील ‘ये दोस्ती’चा व्हिडिओ
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement