GT vs LSG : फटा पोस्टर निकला शाहरूख, कोण आहे गुजरात टायटन्सचा नवा फिनिशर?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
गुजरातचा पराभव झाला आहे. पण या पराभवानंतरही गुजरातला एक नवा फिनिशर मिळाला आहे. हा फिनिशर नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
GT vs LSG : आयपीएलच्या 18व्या हंगामात आज लखनऊ सूपर जाएंटसने प्रथम फलंदाजी करताना 236 धावा ठोकल्या आहेत.या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स 202 धावांपर्यंतच मजल मारू शकली होती.त्यामुळे गुजरातचा पराभव झाला आहे. पण या पराभवानंतरही गुजरातला एक नवा फिनिशर मिळाला आहे. हा फिनिशर नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
गुजरात जाएट्ससमोर 237 धावांचे आव्हान आहे. या धावांचा पाठलाग करताना गुजरातची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण साई सुदर्शन 21 धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर शुभमन गिल 35 आणि जॉस बटलरने 33 धावा केल्या होत्या. या तीन विकेटनंतर गुजरात सामना गमावेल असं वाटलं होतं.
Shahrukh Khan isn't done yet
A fighting half-century from the #GT batter keeps them alive in the chase!
Can he pull off the unthinkable?
Updates https://t.co/NwAHcYJT2n #TATAIPL | #GTvLSG pic.twitter.com/MC635lJVTO
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
advertisement
पण नंतर शेफर्न रुदरफोर्ड आणि शाहरूख खानने गुजरातचा डाव सावरला होता. यावेळी शाहरूख खान 27 बॉल 57 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले आहे.शेवटच्या क्षणी त्याने एकट्यानेच प्रतिकार केला. पण त्याला दुसऱ्या कोणत्याच खेळाडूची व्यवस्थित साथ मिळाली नाही आणि गुजरातने हा सामना गमावला. पण जरी गुजरातने हा सामना गमावला असला तरी आयपीएलच्या फायनल आधी त्यांना शाहरूख खानच्या रूपात नवीन फिनिशर मिळाला आहे.त्यामुळे ही गुजरातसाठी दिलासादायक बाब आहे.
advertisement
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2025 11:55 PM IST