Matthew Hayden : '...नाहीतर मी नग्न फिरेन', जो रूटने वाचवली ऑस्ट्रेलियाच्या बकासुराची लाज, हेडनच्या लेकीची पोस्ट व्हायरल!

Last Updated:

Matthew Hayden Walking Nude In MCG : हेडन याने सिरीजच्या तयारी दरम्यान म्हटलं होतं की, जर रूट यावेळी ऑस्ट्रेलियात टेस्ट शतक बनवू शकला नाही, तर तो मेलबर्नमध्ये नग्न फिरेल.

Matthew Hayden Walking Nude In MCG
Matthew Hayden Walking Nude In MCG
Grace Hayden reaction on Joe Root hundred : ऑस्ट्रेलियन संघाचे माजी स्फोटक ओपनर मॅथ्यू हेडन एका लाजिरवाण्या कृत्यापासून थोडक्यात बचावला आहे. त्याला इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं वाचवलं. रूटने ऑस्ट्रेलियामध्ये आपलं पहिलं टेस्ट शतक झळकावल्यानंतर, सर्वात जास्त आनंद हेडनला झाला. या आनंदामागील कारण थोडे हटके आहे. रूटने जर या अॅशेस मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकही शतक केलं नाही, तर आपण मेलबर्न क्रिकेट ग्राउंड परिसरात नग्न (न्युड वॉक) फिरू, अशी पैज हेडन यांनी लावली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी 'पिंक बॉल' टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये रूटने शानदार शतकी खेळी खेळली. त्यानंतर आता हेडनच्या मुलीने इन्टा स्टोरी व्हायरल झाली आहे.

रुटला शतक झळकावण्यात यश 

रूटने यंदाच्या अॅशेसमध्ये आपल्या पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात सेंच्युरी ठोकली. ऑस्ट्रेलियातील आपल्या 16 व्या टेस्ट मॅचमध्ये अखेरीस त्याला शतक झळकावण्यात यश आलं. रूटला ऑस्ट्रेलियात कोणत्याही टेस्ट मॅचमध्ये प्रथमच 'ट्रिपल-फिगर' गाठण्यासाठी 181 बॉलचा सामना करावा लागला. पिंक बॉल टेस्टमधील जो रूटचे शतक हे मॅथ्यू हेडन याच्यासाठी खूप मोठा दिलासा घेऊन आलं.
advertisement

रुट टेस्ट शतक बनवू शकला नाही तर मी...

हेडन याने सिरीजच्या तयारी दरम्यान म्हटलं होतं की, जर रूट यावेळी ऑस्ट्रेलियात टेस्ट शतक बनवू शकला नाही, तर मी मेलबर्नमध्ये नग्न फिरेल. सप्टेंबर 2025 मध्ये 'ऑल ओव्हर बार द क्रिकेट पॉडकास्ट' (All Over Bar The Cricket Podcast) दरम्यान मॅथ्यू हेडन म्हणाला होता, "तो इंग्लंडच्या टीममधील सर्वात 'कम्प्लीट पॅकेज' आहे. त्यांचा 'एवरेज' 40 चा आहे. मला विश्वास बसत नाही की तुमच्या टीममध्ये जो रूट नाही. मी या समरच्या अखेरीस तुमच्याशी बोलणार आहे. जर त्याने या समरमध्ये सेंच्युरी केली नाही, तर मी MCG मध्ये नग्न फिरेन."
advertisement

तू आमचे डोळे वाचवलेस - ग्रेस हेडन

हेडन याची मुलगी ग्रेस हेडन देखील कॉमेंट्री करत आहे, तिने जेव्हा रूट शतकाकडे वाटचाल करत होता, तेव्हा ट्वीट केले होतं की, "कृपया जो रूट तू शतक बनव." यावरून हेडन कुटुंबियांवर किती तणाव होता हे स्पष्ट होते. रूटने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 40 वं आणि ऑस्ट्रेलियातील पहिलं शतक पूर्ण केल्यानंतर, इंग्लंड क्रिकेटने मॅथ्यू हेडन याचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो रूटला अभिनंदन करत होता. अशातच रूटच्या सेंच्युरीनंतर ग्रेस हेडनने इन्टा स्टोरी शेअर करत रूटचे आभार मानले. तू आमचे डोळे वाचवले, असं ग्रेस हेडन म्हणाली.
advertisement
advertisement

माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच झाला नाही

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये मॅथ्यू हेडन म्हणाले, "गुडडे जो, ऑस्ट्रेलियात सेंच्युरी बनवल्याबद्दल अभिनंदन मित्रा. तुला थोडा वेळ लागला, आणि खरं सांगायचं तर, माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच झाला नाही. मी मनापासून तुझ्या सेंच्युरीला सपोर्ट करत होतो. तर मित्रा, अभिनंदन, 10 फिफ्टी आणि अखेरीस सेंच्युरी. खूप एन्जॉय कर आणि याचा पूर्ण आनंद घे." हेडन यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल जो रूटचे आभार मानले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Matthew Hayden : '...नाहीतर मी नग्न फिरेन', जो रूटने वाचवली ऑस्ट्रेलियाच्या बकासुराची लाज, हेडनच्या लेकीची पोस्ट व्हायरल!
Next Article
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement