MI vs PBKS : रात्री 1:35 पर्यंत मॅच पाहिली, पण हार्दिकची चूक कुणाच्याच लक्षात नाही आली! एका निर्णयाने Mumbai Indians ने सगळंच गमावलं

Last Updated:

MI vs PBKS Hardik Pandya Plan fail : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला अन् पंजाब किंग्जने सामना खिशात घातला. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचं पाच वर्षानंतर फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं आहे.

MI vs PBKS Hardik Pandya Plan fail
MI vs PBKS Hardik Pandya Plan fail
Mumbai Indians vs Punjab Kings : आयपीएल (IPL 2025) च्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक हायव्होल्टेज, श्वास रोखून धरायला लावणारा सामना रंगला. पावसाच्या विलंबामुळे सुरुवातीला तणावाचे वातावरण असले तरी, सामन्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे सामना चर्चात आला. पावसामुळे लांबलेली मॅच रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी संपली. अशातच मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयाने सगळंच गमावावं लागलं, अशी चर्चा आहे.

हार्दिकचा प्लॅन फेल...

हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सविरुद्ध जी रणनिती तयार केली होती, तिच रणनिती हार्दिकने पंजाबविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयस अय्यरने हार्दिक पांड्याचा कट हाणून पाडला. गुजरात टायटन्सविरुद्ध जेव्हा साई सुदर्शन आऊट झाला, तेव्हा हार्दिकने लगेच पारडं फिरवण्यासाठी बुमराहला बॉलिंग दिली. पण पंजाबविरुद्ध हार्दिकचा प्लॅन चालला नाही. हार्दिकने नकळत घोडचूक केली.
advertisement

हार्दिकची घोडचूक

पंजाब किंग्जला विजयासाठी चार ओव्हरमध्ये 41 धावांची गरज होती. त्यावेळी पंजाबचा स्टार प्लेयर श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग खेळत होते. मात्र, बोल्टच्या 17 व्या ओव्हरमध्ये शशांक सिंग रनआऊट झाल्यानंतर पंजाबवर प्रेशर आलं. त्यावेळी हार्दिकने पुढच्याच ओव्हरमध्ये बुमराहला बॉलिंगला आणलं. पण बुमराहला श्रेयसने आडव्या पट्टीत घेतलं अन् चौथी ओव्हर संपवली. त्यामुळे 19 व्या ओव्हरमध्ये बुमराहसाठी ओव्हर शिल्लक राहिल्या नाहीत.
advertisement

ऑस्ट्रेलियनकडून बुमराहची धुलाई

दरम्यान, ऑस्ट्रेलियन जॉश इंग्लिशने बुमराहला पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकून काढलं. बुमराहच्या पहिल्या ओव्हरमध्ये इंग्लिशने दोन फोर आणि दोन सिक्स मारले. या ओव्हरमध्ये बुमराहला 20 धावा ठोकल्या. त्यानंतर हार्दिकने बुमराहला थोडा रेस्ट दिला अन् स्पिनर्सला बोलवलं. अखेरीस बुमराहला अखेरच्या ओव्हरसाठी राखून न ठेवणं मुंबई इंडियन्सला भारी पडलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs PBKS : रात्री 1:35 पर्यंत मॅच पाहिली, पण हार्दिकची चूक कुणाच्याच लक्षात नाही आली! एका निर्णयाने Mumbai Indians ने सगळंच गमावलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement