VIDEO : मुंबईच्या खेळाडूचा मुर्खपणा! Duck वर आऊट होताच...प्रतिस्पर्धी खेळाडूंसह अख्खं स्टेडिअम हसलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अमेरिकेतही मेजर टी20 लीग सूरू आहे . या लीगमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या खेळाडूने मुर्खपणा केला आहे. लाईव्ह सामन्यात हा खेळाडू शून्यावर आऊट झाला असलाना देखील त्याने डिआरएसची मागणी केली.
MLC 2025 News : आयपीएलच्या समाप्तीनंतर आता देशभरात विविध टी20 लीग सूरू आहेत. या लीग दरम्यान अमेरिकेतही मेजर टी20 लीग सूरू आहे . या लीगमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या खेळाडूने मुर्खपणा केला आहे. लाईव्ह सामन्यात हा खेळाडू शून्यावर आऊट झाला असलाना देखील त्याने डिआरएसची मागणी केली.विशेष म्हणजे या खेळाडूची मागणी पाहून प्रतिस्पर्धी खेळाडूंसह अख्खं स्टेडिअम हसलं होतं.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
मेजर लीग क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क आणि सॅनफ्रान्सिको युनिकॉर्न यांच्यात सामना सूरू होता.या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून मिचेल ब्रेसवेल फलंदाजीला उतरला होता. यावेळी पहिल्याच बॉलवर त्याला सॅनफ्रान्सिको युनिकॉर्नच्या रोमारीओ शेफर्डने क्लिनबोल्ड केले होते. मात्र त्याला वाटले त्याला लेग बिफोर द विकेट देण्यात आला आहे. यावर त्याने डिआरएसची मागणी केली होती.या मागणीनंतर शेफर्डने त्याला मागे वळून पाहण्यास सांगितले. यावेळी ब्रेसवेलला कळलं आपण क्लिन बोल्ड झाले आहोत. या घटनेनंतर मैदानावर एकच हास्यकल्लोळ झाला होता.
advertisement
Michael Bracewell tried to take a review after getting bowled out. 🤣pic.twitter.com/ypeWzcb3yc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2025
दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार निकोलस पुरणने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे सॅनफ्रान्सिको युनिकॉर्न प्रथम फलंदाजीला उतरली होती.यावेळी सॅनफ्रान्सिकोकडून मॅट शॉटने 91 धावांची वादळी खेळी केली. त्याला जेक फ्रेसर मॅकगर्क 64 धावांची आणि हसन खानने 31 धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर सॅनफ्रान्सिको युनिकॉर्नने 246 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे मुंबई इडियन्ससमोर 247 धावांचे आव्हान होते.
advertisement
सॅनफ्रान्सिको युनिकॉर्नने 247 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स न्युयॉर्कची सुरूवात चांगली झाली होती. मुंबईकडून क्विंटन डिकॉकने 70 आणि मोनांक पटेलने 60 धावांची खेळी केली. किरण पोलार्डने 34 धावांची खेळी केली. अशाप्रकारे मुंबई 199 धावांपर्यंत मजल मारली होती.त्यामुळे 46 धावांनी मुंबईचा पराभव झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : मुंबईच्या खेळाडूचा मुर्खपणा! Duck वर आऊट होताच...प्रतिस्पर्धी खेळाडूंसह अख्खं स्टेडिअम हसलं