MLC 2025 : मुंबईच्या खेळाडूची रेकॉर्ड ब्रेक खेळी, हातातून गेलेला सामना खेचून आणला, विजयाचं खातंही उघडलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईच्या मोनांक पटेलने 93 धावांची रेकॉर्ड ब्रेक खेळी केली होती.या धावांच्या बळावर मुंबईने हा सामना जिंकत विजयाचं खातं उघडलं आहे.
MLC 2025 News : अमेरिकेत सूरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. आजच्या सामन्यात सिटल ऑर्कासने 200 धावा केल्या होत्या. या भल्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या मोनांक पटेलने 93 धावांची रेकॉर्ड ब्रेक खेळी केली होती.या धावांच्या बळावर मुंबईने हा सामना जिंकत विजयाचं खातं उघडलं आहे.
भारतात जन्मलेल्या मोनांक पटेल मेजर लीग क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या मोनांक पटेल एमएलसीच्या (MLC 2025) इतिहासात सर्वात मोठी खेळी करणारा खेळाडू बनला आहे. गुजरातच्या आणंदमध्ये 1 मे 1993 रोजी जन्मलेल्या मोनांकने मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून खेळताना खतरनाक कारनामा केला आहे. मोनांकने सिएटल ऑकार्सच्या विरूद्ध 50 बॉलमध्ये 93 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 8 चौकार लगावले आहेत. मोनांकच्या या सर्वाधिक खेळीच्या बळावर मुंबईने 7 विकेटसने हा सामना जिंकला आहे.
advertisement
Monank Patel was in fine form tonight, becoming the highest-scoring American batter in MLC history, surpassing Corey Anderson’s previous 91 runs. His stellar performance earned him the title of Stake Player of the Match. 🔥@StakeIND x @stakenewsindia pic.twitter.com/F43VbHdcZJ
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 19, 2025
advertisement
सिएटल ऑकार्सने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 200 धावा केल्या होत्या.त्यामुळे मुंबईसमोर 201 धावांचे आव्हान होते.या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून मोनांक पटेलने 93 धावांची खेळी केली. त्याला मिचेल ब्रेसवेलने 50 धावांची चांगली साथ दिली. त्यानंतर शेवटच्या क्षणी किरन पोलार्डने 10 बॉलमध्ये 26 धावा काढल्याने मुंबईने हा सामना 7 विकेटस राखून जिंकला.
advertisement
तर सिएटल ऑकार्सकडून कायल मेयर्सने 88 धावांची खेळी केली होती. त्याच्य़ा जोडीला शायन जहांगिरने 43 धावा जोडल्या होत्या. या धावांच्या बळावर सिएटल ऑकार्सने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 200 धावा केल्या होत्या.
दरम्यान हा सामना जिंकून मुंबईने विजयाचं खातं उघडलं आहे. या विजयासह मुंबई पॉईट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी पोहोचली आहे. याआधी दोन सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते.तर सिएटल ऑकार्सला सलग तिसरा पराभव स्विकारावा लागला.त्यामुळे हा संघ पाचव्या स्थानी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 5:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MLC 2025 : मुंबईच्या खेळाडूची रेकॉर्ड ब्रेक खेळी, हातातून गेलेला सामना खेचून आणला, विजयाचं खातंही उघडलं