'धोनीने मला शिव्या दिल्या...', भारताकडून 2 वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूचे आरोप, कॅप्टन कूल का भडकला?

Last Updated:

एमएस धोनी याची ओळख भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कूल म्हणून आहे. कितीही दबाव असला तरी आपल्या शांत स्वभावाने खेळ नियंत्रित करण्याच्या धोनीच्या या शैलीचं भारतामधलेच नाही तर जगातले क्रिकेटपटू कौतुक करतात.

'धोनीने मला शिव्या दिल्या...', भारताकडून 2 वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूचे आरोप, कॅप्टन कूल का भडकला?
'धोनीने मला शिव्या दिल्या...', भारताकडून 2 वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूचे आरोप, कॅप्टन कूल का भडकला?
मुंबई : एमएस धोनी याची ओळख भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कूल म्हणून आहे. कितीही दबाव असला तरी आपल्या शांत स्वभावाने खेळ नियंत्रित करण्याच्या धोनीच्या या शैलीचं भारतामधलेच नाही तर जगातले क्रिकेटपटू कौतुक करतात, पण भारताकडून 2 वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूने धोनीवर आरोप केले आहेत. धोनीने मला मैदानामध्ये सगळ्यांसमोर शिव्या दिल्याचं हा क्रिकेटपटू म्हणाला आहे.
भारताकडून 34 मॅच खेळणाऱ्या मोहित शर्माने एका मुलाखतीमध्ये धोनीसोबत झालेल्या त्या घटनेबद्दल सांगितलं आहे. आयपीएलमध्ये मोहित शर्माने त्याची सर्वोत्तम कामगिरी एमएस धोनीच्या नेतृत्वामध्येच चेन्नई सुपर किंग्सकडून केली, त्याचमुळे मोहित शर्मा भारताकडून 2014 टी-20 वर्ल्ड कप आणि 2015 चा वनडे वर्ल्ड कप खेळला. मोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 3 आणि वनडे वर्ल्ड कपमध्ये 8 मॅच खेळल्या.
advertisement

धोनीने मला शिव्या दिल्या

'माझ्या करिअरमध्ये असे अनेक क्षण आले ज्यात मी धोनीला दबावामध्येही एकदम शांत पाहिलं. तो मैदानात भडकेल, याची अपेक्षाही कुणी करत नाही. पण चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्यात तो क्षण आला. धोनीने इश्वर पांडेला बॉलिंगसाठी बोलावलं, पण मला वाटलं त्याने मला बोलावलं आहे', असं मोहित शर्मा म्हणाला.
advertisement
'मी बॉलिंग रन-अप सुरू केला, तेव्हा धोनीने तुला बॉलिंगला बोलावलं नाही, असं सांगितलं. यानंतर त्याने इश्वर पांडेला बोलावण्याचा प्रयत्न केला, पण अंपायरने मलाच बॉलिंग करणं सुरू ठेवायला सांगितलं, कारण मी रन-अप सुरू केला होता. यानंतर धोनी माझ्यावर रागावला आणि त्याने मला शिव्या दिल्या. मी ओव्हरच्या पहिल्याच बॉलला युसूफ पठाणची विकेट घेतली, यानंतर सेलिब्रेशन करत असतानाही तो मला शिव्या देत राहिला', असं वक्तव्य मोहित शर्माने केलं आहे.
advertisement
आयपीएलमध्ये धोनी आणि मोहित शर्मा बराच काळ एकत्र खेळले. यानंतर 2023 मध्ये मोहित शर्माने सीएसकेची साथ सोडून गुजरात टायटन्सकडे जायचा निर्णय घेतला, त्यावर्षी गुजरातची टीम फायनलमध्येही पोहोचली. फायनलमध्ये मोहित शर्माने शेवटची ओव्हर टाकली, पण मोहित शर्माच्या शेवटच्या बॉलवर रवींद्र जडेजाने बाऊंड्री मारून सीएसकेला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'धोनीने मला शिव्या दिल्या...', भारताकडून 2 वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूचे आरोप, कॅप्टन कूल का भडकला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement