Mumbai Indian च्या फायलनच्या नाड्या CSK च्या हातात, थाला करणार पलटणचा गेम? पंजाबच्या पराभवानंतर समजून घ्या गणित
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Indians Qualifier 1 Scenario : दिल्लीने पंजाबचा पराभव केल्यानंतर (DC beat PBKS) आता मुंबई इंडियन्स थेट क्वालिफायर 1 खेळण्याच्या आली शर्यतीत आहे. मुंबई इंडियन्ससाठी कसं असेल फायनलचं गणित? जाणून घ्या
PBKS vs DC, IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला हरवूनही, मुंबई इंडियन्ससाठी (MI) अजूनही क्वालिफायर 1 मध्ये पोहोचण्याची शक्यता कायम आहे. मात्र, यासाठी त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे आणि काही समीकरणे जुळून येणं आवश्यक आहे. क्वालिफायर 1 मध्ये पोहोचण्यासाठी, मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. पलटण आता फायनलमध्ये कशी पोहोचू शकते? जाणून घ्या.
मुंबईचा शेवटचा सामना
येत्या 26 मे रोजी पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध मुंबई इंडियन्सचा (MI) शेवटचा साखळी सामना आहे. हा सामना मुंबईला मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. हा सामना जिंकल्यास मुंबईचे 18 गुण होतील. गुजरात टायटन्स (GT) ने आपला शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 25 मे रोजी हारावा. जर GT जिंकले तर त्यांचे 20 गुण होतील आणि ते थेट अव्वल स्थानी पोहोचतील, ज्यामुळे मुंबईसाठी टॉप-2 मध्ये येणे कठीण होईल. GT हरल्यास त्यांचे 18 गुण कायम राहतील.
advertisement
जर RCB जिंकले तर...
तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आपला शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध 26 मे रोजी हारावा. जर RCB जिंकले तर त्यांचे 19 गुण (किंवा 19 गुण चांगल्या NRR सह) होतील, जे त्यांना मुंबईपेक्षा पुढे ठेवले जातील.
मुंबई आणि गुजरात फायनलमध्ये...
advertisement
जर मुंबई इंडियन्सने आपला शेवटचा सामना जिंकला आणि गुजरात टायटन्सने त्यांचा शेवटचा सामना गमावला, तर मुंबई आणि गुजरात दोघेही 18 गुणांवर असतील. मुंबईचा सध्याचा नेट रन रेट (NRR) १.२९२ आहे, जो गुजरातच्या ०.६०२ पेक्षा खूप चांगला आहे. यामुळे, 18 गुणांवर बरोबरीत आल्यास मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला मागे टाकून अव्वल दोनमध्ये स्थान मिळवू शकते.
advertisement
क्वालिफायर 1 जिंकून फायनलमध्ये जाणार?
थोडक्यात, मुंबई इंडियन्सला आपला शेवटचा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांनी आपले शेवटचे साखळी सामने गमावण्याची अपेक्षा करावी लागेल, किंवा त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा खूप कमी असावा लागेल. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स क्वालिफायर 1 जिंकून फायनलमध्ये जाणार का? असा सवाल विचारला जातोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 25, 2025 7:59 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indian च्या फायलनच्या नाड्या CSK च्या हातात, थाला करणार पलटणचा गेम? पंजाबच्या पराभवानंतर समजून घ्या गणित