मुंबई इंडियन्सचं धक्कातंत्र, फक्त 6 खेळाडूंनाच केलं रिटेन, बाकीच्यांना दिला नारळ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
मुंबई : आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या या मोसमात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनी प्ले-ऑफ गाठली. आयपीएलप्रमाणेच मुंबई इंडियन्सच्या जगभरातल्या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये टीम आहेत. आयएल टी-20 म्हणजेच इंटरनॅशनल लीग टी-20 या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या टीमचं नाव एमआय एमिरेट्स आहे. या स्पर्धेसाठी मुंबईने रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
एमआय एमिरेट्सने कुसल परेरा, फजलहक फारुकी, मुहम्मद वसीम, रोमारियो शेफर्ड, टॉम बॅन्टन आणि एएम घझनफर यांना रिटेन केलं आहे. तर क्रिस वोक्स आणि कामिंदू मेंडिस यांना मुंबईने टीममध्ये घेतलं आहे. आयएल टी-20 स्पर्धेच्या आयोजकांनी चौथ्या मोसमासाठीच्या पहिल्या टप्प्यातील खेळाडूंची घोषणा केली आहे.
आयएल टी-20 मधील प्रत्येक टीम जास्तीत जास्त 23 खेळाडू टीममध्ये घेऊ शकते. यातले 8 खेळाडू रिटेन किंवा थेट विकत घेतले जाऊ शकतात. आयएल टी-20च्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलावही होणार आहे. आयएल टी-20च्या चौथ्या मोसमात एकूण 6 टीम सहभागी होणार आहेत. 34 सामन्यांची ही स्पर्धा 4 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे.
advertisement
पोलार्ड-पूरन रिलीज
आयएल टी-20च्या मोसमासाठी मुंबईने निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, आंद्रे फ्लेचर, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना रिलीज केलं आहे. निकोलस पूरन तर आयएल टी-20 च्या मागच्या मोसमात एमआय एमिरेट्सचा कर्णधार होता. आयपीएल 2025 च्या या मोसमात निकोलस पूरनने धमाका केला होता. तसंच जगभरात टी-20 लीग खेळण्यासाठी निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2025 8:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मुंबई इंडियन्सचं धक्कातंत्र, फक्त 6 खेळाडूंनाच केलं रिटेन, बाकीच्यांना दिला नारळ!