Team India : 'आगरकर-गंभीरला हाकला...', वाद वाढल्यानंतर सिद्धू समोर आला, अन् थेट लाजच काढली!

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे. या पराभवानंतर कोच गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात येत आहे.

'आगरकर-गंभीरला हाकला...', वाद वाढल्यानंतर सिद्धू समोर आला, अन् थेट लाजच काढली!
'आगरकर-गंभीरला हाकला...', वाद वाढल्यानंतर सिद्धू समोर आला, अन् थेट लाजच काढली!
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे. या पराभवानंतर कोच गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात येत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू याचीही सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे, ज्यात गौतम गंभीर आणि अजित आगरकरला हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावर आता स्वत: नवजोत सिंग सिद्धूने प्रतिक्रिया दिली आहे.
'जर टीम इंडियाला 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर बीसीसीआयने गौतम गंभीर आणि अजित आगरकरला लगेच हटवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सन्मानाने रोहित शर्माकडे कॅप्टन्सी सोपवली पाहिजे', असं सिद्धू म्हणाला असल्याची पोस्ट समोर आली होती, त्यावर सिद्धूने स्पष्टीकरण दिलं आहे.
'मी कधीच असं म्हणालो नाही, खोटी बातमी पसरवू नका. मी कधी असा विचारही करू शकत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे', अशी पोस्ट नवजोत सिंग सिद्धूने केली आहे. अजित आगरकर आणि गौतम गंभीरच्या नावाने फिरत असलेली पोस्ट खोटी असल्याचं सिद्धू म्हणाला आहे.
advertisement

गंभीर-आगरकरवर टीका

मागच्या काही काळापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहितची कॅप्टन्सी काढून गिलला कर्णधार करण्याच्या निर्णयानंतर चाहते संतापले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? या प्रश्नावर अजित आगरकरने स्पष्ट उत्तर दिलं नाही. 2027 ला अजून बराच वेळ असल्याचं आगरकर म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 'आगरकर-गंभीरला हाकला...', वाद वाढल्यानंतर सिद्धू समोर आला, अन् थेट लाजच काढली!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement