नाव ठेवणाऱ्यांचे तोंड बंद केलं! YouTube च्या कमाईतून बांधला अलिशान बंगला
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावातील ITI पर्यंत शिक्षण घेतलेले औदुंबर गवारे यांनी युट्युब वर मनोरंजनात्मक व्हिडिओ टाकून यूट्यूब कडून मिळालेल्या कमाईतून त्यांनी चक्क 25 लाखाचा बंगला बांधला आहे.
सोलापूर: यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यावर मनोरंजनाचे व्हिडिओ टाकून लोकांचा मनोरंजनाची नव्हे तर त्यातून उत्पन्न देखील कमवू शकता एक सिद्ध करून दाखवलं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावातील ITI पर्यंत शिक्षण घेतलेले औदुंबर गवारे यांनी युट्युब वर मनोरंजनात्मक व्हिडिओ टाकून यूट्यूब कडून मिळालेल्या कमाईतून त्यांनी चक्क 25 लाखाचा बंगला बांधला आहे.पाहूया हा विषय वृत्तांत.
औदुंबर गवारे हे मूळचे धाराशिव जिल्ह्याचे रहिवासी आहे. आयटीआय पर्यंत शिक्षण शिकवण त्यांनी पुण्यात एका नामांकित आयटी कंपनीत काम केलं. पण हवा तसं मानधन त्यांना मिळत नव्हता. मग त्यांनी तो जॉब सोडला आणि सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात स्थायिक झाले. तिथे पाण्याचा झार टाकण्याचं काम व गोळ्या बिस्किट विक्री करण्याचं काम केलं. सुरुवातीला औदुंबर गव्हारे टिक टॉक ॲप वर व्हिडिओ अपलोड करत होते. जेव्हा टिकटॉक बंद झाला तेव्हा औदुंबर यांनी youtube वर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली.
advertisement
टेंभुर्णी गावातील औदुंबर गवारे सुरुवातीला स्वतः व्हिडिओ बनवत होते. मग त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. युट्युब वर आलेल्या पेमेंट वर 2024 मध्ये त्यांनी तीन गुंठे जागा खरेदी केली. एका वर्षानंतर त्यांनी youtube च्या कमाईवर तब्बल 25 लाख रुपयांचा स्वप्नाचा बंगला बांधला आहे. तर बांधलेल्या बंगल्यावर औदुंबर गवारे यांनी youtube चा लोगो लावला आहे. युट्युब वर करियर करायचं असेल तर खचून न जाता नवीन कंटेंट शोधून व्हिडिओ अपलोड करून अधिकाधिक उत्पन्न मिळवता येईल असा सल्ला नवीन youtube वर यांना औदुंबर गवारे यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 20, 2025 4:42 PM IST