Sarfaraz Khan : वजन कमी केलं, शतकावर शतक ठोकतोय! तरीही सरफराज खानला साऊथ अफ्रिकेविरुद्ध 'नो एन्ट्री', BCCI ला अजून काय पाहिजे?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
No place for Sarfaraz Khan in the India A : बीसीसीआयने साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या सामन्यांसाठी टीम जाहीर केली. पण यात शतकावर शतक ठोकणाऱ्या सरफराजला संधी मिळाली नाही.
Sarfaraz Khan News : दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने फक्त काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यातील 4 दिवसाच्या 2 कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यानंतर बीसीसीआयनेही संघाची घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया ए संघाचं ऋषभ पंत नेतृत्व करणार आहे. तर साई सुदर्शन याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मुंबईच्या आयुश म्हात्रेला संधी देण्यात आली पण सरफराज खान याला डच्चू देण्यात आली आहे.
सरफराज खान याला जागा नाही
युवा फलंदाज सरफराज खान याच्यासाठी भारत ‘ए’ टीममधील स्थान मिळवणं आव्हानात्मक ठरत आहे. इंग्लंड दौऱ्यात भारत ‘ए’ टीमकडून खेळताना त्याने पहिल्या अनऑफिशियल सामन्यात 92 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मात्र, दुर्दैवाने तो नंतर दुखापतीमुळे टीममधून बाहेर गेला. दुखापतीतून सावरल्यानंतर सरफराजने आपल्या तंदुरुस्तीत लक्षणीय सुधारणा केली आणि वजन कमी केले. फिटनेस सुधारून त्याने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कमबॅक करत महत्त्वाच्या 74 रन्सची इनिंग खेळली. असे असतानाही, दक्षिण आफ्रिका ‘ए’ विरुद्धच्या आगामी 4-दिवसीय सामन्यांसाठी जाहीर झालेल्या भारत ‘ए’ टीममध्ये सरफराज खान याला जागा मिळाली नाही. या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
advertisement
कुणाला मिळाली संधी?
दरम्यान, 4 दिवसांच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, सरांश जैन, आयुष बडोनी यांना संधी देण्यात आलीये. तर दुसऱ्या सामन्यात गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप यांना संधी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड देखील दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल.
advertisement
पहिल्या मॅचसाठी इंडिया ए संघाचा स्कॉड - ऋषभ पंत (कॅप्टन), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन (व्हाईस कॅप्टन), देवदत्त पडिककल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी आणि सरांश जैन.
दुसऱ्या मॅचसाठी इंडिया ए संघाचा स्कॉड - ऋषभ पंत (कॅप्टन), केएल राहुल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन (व्हाईस कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 2:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sarfaraz Khan : वजन कमी केलं, शतकावर शतक ठोकतोय! तरीही सरफराज खानला साऊथ अफ्रिकेविरुद्ध 'नो एन्ट्री', BCCI ला अजून काय पाहिजे?