Mohsin Naqvi : पाकिस्तान अखेर गुडघ्यावर! मोहसिन नक्वी यांनी मागितली माफी, पण ट्रॉफीसाठी ठेवली एक अट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Asia Cup Trophy Mohsin Naqvi Ind vs Pak : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चीफ मोहसिन नक्वी यांनी केलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बीसीसीआयची माफी मागितली आहे. परंतू ट्रॉफी देण्यासाठी त्याने एक अट ठेवलीये.
Mohsin Naqvi Apologizes to BCCI : पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आशियाई क्रिकेट काऊंसिलच्या बैठकीत बीसीसीआयची माफी मागितली. मोहसिन यांनी बीसीसीआयची माफी मागितली असली तरी, आशिया कप ट्रॉफी भारताला परत करण्यास ते अजूनही मनापासून तयार नाही, असं चित्र समोर आलं आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी स्वतः एसीसी कार्यालयात येऊन ट्रॉफी घ्यावी, अशी अट ठेवली आहे.
आयसीसीकडे तक्रार करण्याची धमकी
30 सप्टेंबर रोजी एसीसीच्या व्हर्च्युअल बैठकीत बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये शाब्दिक चर्चा झाली, त्यादरम्यान मोहसिनने बीसीसीआयची माफी मागितली, परंतु बीसीसीआय ठाम राहिला. त्यानंतर मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली. बीसीसीआयने पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना शक्य तितक्या लवकर ट्रॉफी परत करण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर आयसीसीकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती.
advertisement
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चीफ मोहसिन नकवी ने BCCI से मांगी माफ़ी
|Asia Cup | IND vs PAK | Mohsin Naqvi@AMRITIBN7@m_shivanipandey pic.twitter.com/YzXwQlCEJS
— News18 India (@News18India) October 1, 2025
एसीसी कार्यालयात येऊन ट्रॉफी घेतली तरच...
advertisement
बीसीसीआयची माफी मागितल्यानंतर मोहसिन नक्वी यांनी खरे रंग दाखवले. त्यांनी यावेळी एक अट ठेवली. जर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः एसीसी कार्यालयात येऊन ट्रॉफी घेतली तर तो ती त्यांना आशिया कपची ट्रॉफी देण्यात येईल, असं नक्वी यांनी सांगितलं. त्यावर बीसीसीआयने नक्वींची मागणी फेटाळून लावली.
मोहसीन नक्वीला जाब विचारला
advertisement
दरम्यान, आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली. या बैठकीसाठी बीसीसीआयकडून राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राजीव शुक्ला यांच्यासह आशिष शेलार यांनी मोहसीन नक्वीला चांगलाच जाब विचारला. त्यामुळे आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीतही जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 1:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohsin Naqvi : पाकिस्तान अखेर गुडघ्यावर! मोहसिन नक्वी यांनी मागितली माफी, पण ट्रॉफीसाठी ठेवली एक अट