Asia Cup Trophy : हॉटेलमध्ये लपवून ठेवलेली ट्रॉफी देण्यास Mohsin Naqvi ची तयारी, पण काय ठेवली अट? BCCI चा प्लॅन बी रेड्डी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mohsin Naqvi On Asia Cup Trophy : मोहसिन नक्वी यांनी आशिया कप विजेत्या संघाचे पदकं आणि ट्रॉफी भारतीय संघाला देण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र एक अट ठेवली.
Asia Cup 2025 Drama : आशिया कपची फायनल जिंकल्यानंतर पुरस्कार सोहळ्यादरम्यान नक्वी मैदानावर आले आणि स्टेजवर उभे राहिले, परंतु भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडून ट्रॉफी (Asia Cup Trophy) स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी ठाम राहिले. नंतर, नक्वी ट्रॉफी त्यांच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते, ज्यामुळे भारतीय संघ ट्रॉफी आणि पदकांशिवाय आनंद साजरा करू लागला. त्यानंतर आता टीम इंडिया भारतात देखील परतली आहे. आता नक्वी यांनी भारताला खोड्या काढण्यास सुरूवात केलीये.
टीम इंडियाने प्रतिमा धुळीस मिळवली
सूर्यकुमार यादव यांच्या संघातील खेळाडूंमध्ये तासभर जोरदार चर्चा झाली. भारताने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष खालिद अल झारुनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु कदाचित घरी आपली प्रतिमा जपण्यासाठी नक्वी यांनी तो ट्रॉफी सादर करण्याचा आग्रह धरला. मात्र, टीम इंडियाने त्यांची प्रतिमा धुळीस मिळवली होती.
advertisement
मोहसिन नक्वी यांनी एक अट घातली
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कप विजेत्या संघाचे पदके आणि ट्रॉफी भारतीय संघाला देण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, त्यांनी एक अट घातली आहे. नक्वी यांना औपचारिक समारंभ आयोजित करून भारताला ट्रॉफी सोपवायची आहे. यामुळे पाकिस्तानला त्यांची गेलेली इज्जत परत मिळेल, अशी आशा आहे. पण बीसीसीआय ही मागणी फेटाळून लावेल, अशी शक्यता आहे.
advertisement
BCCI चा प्लॅन B रेड्डी
दरम्यान, सीएनएन-न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने माहिती समोर आली आहे की, ट्रॉफी दुबईतील एसीसी मुख्यालयात नाही. बीसीसीआयने म्हटले आहे की मोहसिन नक्वी यांनी ज्या पद्धतीने ट्रॉफी ठेवली आहे ती कायदेशीर नाही. बीसीसीआय एसीसीकडे ट्रॉफी सोपवण्याची औपचारिक विनंती करतील. त्यानंतर देखील नक्वीने माज दाखवला तर बीसीसीआय मोठी अॅक्शन घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय इतर बोर्डाशी बोलून मोहसिन नक्वी यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची पाऊलं देखील उचलू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Trophy : हॉटेलमध्ये लपवून ठेवलेली ट्रॉफी देण्यास Mohsin Naqvi ची तयारी, पण काय ठेवली अट? BCCI चा प्लॅन बी रेड्डी!