Nana Patekar: दिवसाला 60 सिगारेट ओढायचे नाना पाटेकर, पण अचानक घडलं असं काही... एका रात्रीत सुटली सवय

Last Updated:
Nana Patekar: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारे नाना पाटेकर क्वचितच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतात. एक काळ असा होता जेव्हा नाना दिवसभरात 60 सिगारेट ओढायचे.
1/7
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारे नाना पाटेकर क्वचितच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतात. एक काळ असा होता जेव्हा नाना दिवसभरात 60 सिगारेट ओढायचे. मात्र एक असा क्षण आला जेव्हा त्यांनी अचानक सिगारेट बंद केली.

advertisement
2/7
नाना यांनी त्यांच्या या सवयीविषयी स्वतःच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. जेव्हा नाना पाटेकरांना पहिला मुलगा झाला तेव्हा तो जन्मापासूनच आजारी होता. एका डोळ्याला दिसत नव्हतं. अडीच वर्षांचा असताना मुलगा दुर्वासाचा मृत्यू झाला आणि नाना पूर्णपणे खचले.

3/7
द लल्लनटॉपला दिलेल्या एका जुना मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, या धक्क्यानंतर त्यांनी सिगारेटचा आधार घेतला.
द लल्लनटॉपला दिलेल्या एका जुना मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, या धक्क्यानंतर त्यांनी सिगारेटचा आधार घेतला. "मी दिवसाला 60 सिगारेट ओढायचो. आंघोळ करताना सुद्धा माझ्या हातात सिगारेट असायची. एवढं धूम्रपान करत होतो की माझ्या गाडीत कोणी बसायलाच तयार नसायचं."
advertisement
4/7
दारूचं व्यसन त्यांना कधीच नव्हतं, पण सिगारेटचं वेड अंगात बसलं होतं. आयुष्य हळूहळू धुराच्या आहारी गेलं होतं.पण मग घडलं असं काही, ज्याने नानांचा संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

5/7
नानांची बहीण, जिला आधीच आपला मुलगा गमवावा लागला होता, तिने नानाला खोकताना पाहिलं आणि एका वाक्यात त्यांचं डोळे उघडले.
नानांची बहीण, जिला आधीच आपला मुलगा गमवावा लागला होता, तिने नानाला खोकताना पाहिलं आणि एका वाक्यात त्यांचं डोळे उघडले. "ती म्हणाली, अजून काय पाहायचं आहे तुला?" या एका वाक्याने नाना हादरले. त्याच दिवशी त्यांनी सिगारेट कायमची सोडली.
advertisement
6/7
आज नाना पाटेकर म्हणतात की, धूम्रपान सोडणं हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश होतं. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक चढउतारांचा सामना केला. सोबतच करिअरममध्येही खूप स्ट्रगल केलं.

7/7
दरम्यान, आज नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असे दिग्गज अभिनेते आहेत, जे त्यांच्या दमदार आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखले जातात. ते केवळ अभिनेताच नव्हे, तर एक चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही कार्यरत आहेत.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement