CSK सोबत वादानंतर R Ashwin ने तडकाफडकी घेतली IPL मधून निवृत्ती! क्रिडाविश्वात खळबळ
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
R Ashwin IPL Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये पाच वेगवेगळ्या संघांकडून खेळलेल्या अश्विनने त्याच्या निवृत्तीबद्दल ट्विट केले आहे. गेल्या वर्षी अश्विननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता.
R Ashwin IPL Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये पाच वेगवेगळ्या संघांकडून खेळलेल्या अश्विनने त्याच्या निवृत्तीबद्दल ट्विट केले आहे. गेल्या वर्षी अश्विननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. आता आयपीएलमधून निवृत्ती आता जगभरातील वेगवेगळ्या फ्रँचायझींमध्ये क्रिकेट खेळताना दिसू शकतो, असं हिंट देखील अश्विनने दिली आहे.
निवृत्ती घेताना काय म्हणाला अश्विन?
खास दिवस आणि एक खास सुरुवात. प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते असे म्हणतात. आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा प्रवास आज संपतो पण मी खेळाचा शोध घेत राहतो आणि वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत राहीन, असं आर अश्विन म्हणाला आहे. प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा काळ आज संपत आहे, परंतु विविध लीगभोवती खेळाचा शोध घेणारा माझा काळ आजपासून सुरू होतोय, असंही अश्विनने म्हटलंय.
advertisement
Special day and hence a special beginning.
They say every ending will have a new start, my time as an IPL cricketer comes to a close today, but my time as an explorer of the game around various leagues begins today .
Would like to thank all the franchisees for all the…
— Ashwin (@ashwinravi99) August 27, 2025
advertisement
CSK सोबत वाद काय?
रविचंद्रन अश्विनने याने स्वत:च्या फ्रेंचायझीवर खळबळजनक आरोप केले होते. डेवाल्ड ब्रेविस याला चेन्नईमध्ये घेताना झालेला करार यावर बोलताना अश्विनने खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला अधिकृतरित्या स्टेटमेंट द्यावं लागलं. अशातच आर अश्विन याने आता पुढे येऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं होतं.
advertisement
आश्विनचं आयपीएल करियर
आर. अश्विनने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबत आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. तो 2015 पर्यंत संघाचा अविभाज्य भाग होता. या काळात त्याने संघाला 2010 आणि 2011 मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2025 च्या आयपीएल हंगामासाठी अश्विन तब्बल नऊ वर्षांनंतर सीएसके संघात 9.75 कोटी रुपयांमध्ये परतला होता. मात्र, सीएसकेसाठी 2025 चा हा हंगाम त्याच्यासाठी आणि संघासाठी फारसा चांगला ठरला नाही.
advertisement
2025 च्या हंगामात त्याने सीएसकेसाठी 9 सामने खेळले, ज्यात त्याने केवळ 7 विकेट्स घेतल्या. या हंगामातील त्याची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती आणि त्याची इकॉनॉमी (9.12) ही त्याच्या आयपीएलमधील एका हंगामातील सर्वात खराब इकॉनॉमी ठरली. अशातच आता त्याने निवृत्ती जाहीर केलीये.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK सोबत वादानंतर R Ashwin ने तडकाफडकी घेतली IPL मधून निवृत्ती! क्रिडाविश्वात खळबळ


