Radha Yadav : टोमणे ऐकले पण पोरीला खेळवलं, लेकीनं केलं कष्टाचं चीज; बापानं अभिमानानं डोक्यावर मिरवली वर्ल्ड कपची ट्रॉफी!
- Published by:Saurabh Talekar
 
Last Updated:
Radha Yadav Father Celebration : लेकीची कामगिरी बाप उघड्या डोळ्यांनी स्टेडियममधून पाहत होता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राधा यादवच्या वडिलांना अश्रू अनावर झाले अन् डोक्यावर वर्ल्ड कप घेऊन त्यांनी आनंद व्यक्त केला.
Radha Yadav Struggle story : वर्ल्ड कप कुणीही जिंको, पोरं असो वा पोरी, वर्ल्ड कप तो वर्ल्ड कप होता है, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसून आलं. भारतीयांनी टीम इंडियाच्या वुमेन्स संघाच्या कामगिरीचं कौतूक केलं अन् जंगी सिलेब्रेशन देखील केलं आहे. टीम इंडियाच्या विजयात राधा यादवची कामगिरी महत्त्वाची ठरली. लेफ्ट आर्म स्पिनर असलेल्या राधा यादवने मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या अन् टीम इंडियासाठी विजयाच्या वर्ल्ड कप विजयात मोलाची साथ दिली. लेकीची ही कामगिरी बाप उघड्या डोळ्यांनी स्टेडियममधून पाहत होता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राधा यादवच्या वडिलांना अश्रू अनावर झाले अन् डोक्यावर वर्ल्ड कप घेऊन त्यांनी आनंद व्यक्त केला.
परिस्थिती हलाखीची पण पोरीनं जिद्द सोडली नाही
21 एप्रिल 2000 रोजी जन्मलेली राधा यादव, मुंबईतील कंडिवली येथील एका 220 चौरस स्क्वेअर फूट घरात लहानाची मोठी झाली. तिचे वडील ओमप्रकाश यादव हे घराबाहेर भाजी आणि दुधाचा स्टॉल चालवत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, क्रिकेट खेळणे हे तिच्या वडिलांच्या आवाक्याबाहेर होते. पण, राधाची क्रिकेटची आवड लहानपणापासूनच होती. ती नेहमी गल्लीत टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसत असे. तिच्या मोठ्या बहिणीनेही तिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आपल्या खेळाला बाजूला ठेवलं.
advertisement
- Look at Radha Yadav's father celebrating and dancing with World Cup Trophy. pic.twitter.com/2o9byoYOvw
— Tanuj (@ImTanujSingh) November 4, 2025
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्लॅटफॉर्म मिळाला
राधा 12 वर्षांची असताना, 2013 मध्ये स्थानिक प्रशिक्षक प्रफुल्ल नाईक यांची नजर राधाच्या खेळावर पडली. त्यांनी तिच्या वडिलांशी बोलून राधाला मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली, तसेच तिच्या क्रिकेट किटचा खर्चही उचलला. नाईक सरांनीच तिला वेगवान गोलंदाजी सोडून डावखुरी फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला, राधाने देखील तिला कष्ट कमी पडू दिले नाहीत. वडोदरा येथे स्थायिक झाल्यानंतर, तिला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगले प्लॅटफॉर्म मिळाले आणि तिने बडोदाच्या अंडर-19 टीमचे यशस्वी नेतृत्वही केलं.
advertisement
वुमेन्स टी20 इंटरनॅशनलमध्ये पदार्पण
2016 मध्ये, प्रफुल्ल नाईक यांनी वडोदरा येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि राधानेही त्यांच्यासोबत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडोदरा येथे स्थायिक झाल्यानंतर, तिला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगले प्लॅटफॉर्म मिळाले आणि तिने बडोदाच्या अंडर-19 टीमचे यशस्वी नेतृत्वही केले. डोमेस्टिक क्रिकेटमधील दमदार परफॉर्मन्सनंतर, राधा यादवला फेब्रुवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया मध्ये संधी मिळाली आणि तिने वुमेन्स टी20 इंटरनॅशनल मध्ये पदार्पण केलं.
advertisement
पहिल्या कमाईतून वडिलांना दुकान घेतलं
दरम्यान, राधा यादवने आपल्या पहिल्या कमाईतून तिने वडिलांसाठी एक छोटेसे दुकान विकत घेतले. वडिलांनी आता भाजी विकणं सोडावं आणि शांत जीवन जगावं, अशी राधाची इच्छा आहे. मुंबईतील एका भाजी विक्रेत्याची मुलगी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी राधा, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अशक्य काहीच नाही हे सिद्ध करते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Radha Yadav : टोमणे ऐकले पण पोरीला खेळवलं, लेकीनं केलं कष्टाचं चीज; बापानं अभिमानानं डोक्यावर मिरवली वर्ल्ड कपची ट्रॉफी!


