Ranji Trophy : W,W,W,W,W,W...पुण्याच्या बॉलरची कमाल,पंजाबची दाणादाण उडवली, रणजीत महाराष्ट्राचा सनसनाटी विजय
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पुण्याच्या एका युवा गोलंदाजाने एकाच इनिंगमध्ये घेतलेल्या सहा विकेटसमुळे महाराष्ट्राला हा सामना जिंकता आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या विजयाची प्रचंड चर्चा आहे.
Maharashtra vs Punjab Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या इलाईट स्पर्धेत आज महाराष्ट्राने एक डाव आणि 92 धावांनी पंजाबचा पराभव केला आहे. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पुण्याच्या एका युवा गोलंदाजाने एकाच इनिंगमध्ये घेतलेल्या सहा विकेटसमुळे महाराष्ट्राला हा सामना जिंकता आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या विजयाची प्रचंड चर्चा आहे.
advertisement
महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 350 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा पहिला डाव हा 151 धावांवर ऑल आऊट झाला होता. पंजाबकडून अनमोल मल्होत्राने सर्वाधिक 35 धावा ठोकल्या होत्या. या व्यतिरीक्त एकाही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या. तर महाराष्ट्राकडून आरएस हंगरेगेकर याने सर्वाधिक पाच तर रजनीश गुरबानीने 4 विकेटस आणि जलज सक्सेनाने एक विकेट घेतली होती.
advertisement
VICTORIOUS 💪
A commendable team performance by Maharashtra sealing a win against Punjab. Arshin Kulkarni marking his century with Prithvi Shaw anchoring the innings for Maharashtra. Rajvardhan Hangargekar pulling off a fifer and Rajneesh Gurbani scalping 4 wickets. Vicky… pic.twitter.com/grIqMNEFtA
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) November 18, 2025
advertisement
पंजाबचा पहिला डाव 151 धावांवर ऑल आऊट झाल्याने महाराष्ट्राकडे 200 धावांनी आघाडी होती. इतक्या मोठ्या धावांची आघाडी असल्याने महाराष्ट्राने पंजाबला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे पंजाब दुसरा डाव 200 धावांचा पाठलाग करताना 107 वर ऑल आऊट झाला होता. पंजाबकडून दुसऱ्या डावात अभिनव शर्माने सर्वाधिक 23 धावा केल्या होत्या. या व्यतिरीक्त एकाही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या, त्यामुळे पंजाबचा डाव 107 वर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे महाराष्ट्राने हा एक डाव आणि 92 धावांनी हा सामना जिंकला आहे.
advertisement
महाराष्ट्राकडून पंजाबच्या दुसऱ्या डावात पुण्याच्या विकी ओस्टवालने 6 विकेट काढल्या होत्या. रामकृष्ण घोषने 2 तर जलज सक्सेना आणि अर्शिल कुलकर्णीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
महाराष्ट्राने पहिल्या डावात 350 धावा ठोकल्या होत्या.महाराष्ट्राकडून अर्शिल कुलकर्णीने 133 धावांची शतकीय खेळी केली होती.त्याच्यासोबत पृथ्वी शॉने 74 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर महाराष्ट्राने 350 धावा केल्या होत्या. यावेळी पंजाबकडून गुरनूर ब्रार सर्वाधिक 4 विकेट तर आयुष गोयल, हरप्रित ब्रार आणि मारकंडेने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : W,W,W,W,W,W...पुण्याच्या बॉलरची कमाल,पंजाबची दाणादाण उडवली, रणजीत महाराष्ट्राचा सनसनाटी विजय


