Vaibhav Suryavanshi च्या 280 च्या स्ट्राईक रेटने धावा, पण 'तो' खेळाडू भाव खाऊन गेला, अख्खी मॅच फिरवली

Last Updated:

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशी रणजीच्या मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे यावेळेस त्यांच्या खांद्यावर बिहारच्या उपकर्णधाराची जबाबदारी आहे.

ranji trophy vaibhav suryavanshi
ranji trophy vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi Ranji Trophy 2025-26 : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशी रणजीच्या मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे यावेळेस त्यांच्या खांद्यावर बिहारच्या उपकर्णधाराची जबाबदारी आहे. या गोष्टीचे भान ठेवत त्याने अरुणाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यात 280 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. पण या धावा करून देखील तो फेल ठरला, त्याच्याजागी उलट एका युवा खेळाडूने मैदान मारलं आहे.या युवा खेळाडूने डबल सेच्यूरी ठोकली आहे.त्यामुळे तो चांगलाच भाव खाऊन गेला आहे.
advertisement
रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात अरूणाचल विरूद्ध खेळताना वैभव सुर्यवंशी अवघ्या 14 धावांवर बाद झाला होता.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 280 चा होता.पण असे असून देखील तो फेल ठरला. पण त्याच्यानंतर मैदानात उतरलेल्या आयुष लोहारूकाने डबल सेंच्यूरी ठोकली. आयुषने 247 बॉलमध्ये 226 धावांची द्विशतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 1 षटकार आणि 37 चौकार ठोकले होते.
advertisement
advertisement
या व्यतिरीक्त सचिन सिंहने 75 धावांची खेळी केली होती.यासह कर्णधार साकीबुल गणीने 59 आणि बिपिन सौरभने 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या धावांच्या बळावर बिहारने पहिला डाव 9 विकेटवर 542 धावा करून घोषित केला होता. अरुणाचलकडून टेची नेरीने 3 विकेट, यब निया, नबाम डोल, अभिनव सिंह आणि मोहितने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
तर याधी अरूणाचल प्रदेशचा पहिला डाव हा 105 धावांवर ऑल आऊट झाला होता. अरूणाचलकडुन सिद्धार्थ बलोदीने सर्वांधिक 24 धावा ठोकल्या होत्या . बाकी इतर खेळाडूंना 20 धावांचा आकडाही गाठता आला नव्हता.त्यामुळे बिहारने 542 धावा करून दुसऱ्या डावासाठी 437 धावांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी पाहता आता बिहारच्या आयुष लोहारूकाने ठोकलेल्या डबल सेंच्यूरीने अख्खी मॅच फिरणार इतकं नक्की. कारण दुसऱ्या डावात 437 धावा ठोकणे अशक्य आहे. सध्या अरुणाचलच्या 94 धावांवर तीन विकेट पडल्या आहे.जर बिहारने त्यांना ऑल आऊट केले तर एका इनिंगने सामना जिंकण्याची संधी बिहारकडे आहे. त्यामुळे सामन्यात पुढे काय होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi च्या 280 च्या स्ट्राईक रेटने धावा, पण 'तो' खेळाडू भाव खाऊन गेला, अख्खी मॅच फिरवली
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement