IND vs AUS 3rd ODI : 82 शतक ठोकणाऱ्या विराटला पार्टनरने दिली संजीवनी, दाखवून दिली किंग कोहलीची सर्वात मोठी चूक!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ravi Shastri On Virat Kohli : टीम इंडियामध्ये प्रत्येक स्थानासाठी तीव्र स्पर्धा असल्याने त्याला लवकरच फॉर्ममध्ये परतण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी बोलून दाखवलं आहे.
Ravi Shastri On Virat Kohli : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या फॉर्मसाठी संघर्ष करताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय मॅचमध्ये एकही रन न काढता आऊट व्हावे लागले आहे. पर्थ येथे झालेल्या पहिल्या मॅचमध्ये आणि ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या मॅचमध्येही त्याला खाते उघडता आले नाही, ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. त्याच्या कारकिर्दीत सलग दोन वन-डे इनिंग्जमध्ये शून्य धावांवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशातच आता विराटच्या कोहलीच्या खास जोडीदाराने (Ravi Shastri) विराटला बजावल्याचं पहायला मिळालं आहे.
लवकर फॉर्ममध्ये परतण्याची गरज - रवी शास्त्री
टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला सुनावलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियामध्ये प्रत्येक स्थानासाठी तीव्र स्पर्धा असल्याने त्याला लवकरच फॉर्ममध्ये परतण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी बोलून दाखवलं आहे. अशा परिस्थितीत, कोहली, रोहित किंवा इतर कोणीही त्यांच्या स्थानाबद्दल समाधानी राहू शकत नाही. गोष्टी आता सोप्या नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
फूटवर्कमध्ये काही अडचण - रवी शास्त्री
दोन्ही सामन्यातही कोहली एकही रन न करता आऊट झाला, ज्यामुळे त्याच्या फूटवर्कमध्ये काही अडचण दिसून येत होतं. आतापर्यंतचा एकदिवसीय सामन्यांमधील त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि सलग दोन सामन्यांमध्ये तो धावा न करता बाद होणं हे खूपच निराशाजनक असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
advertisement
विराटची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच?
दरम्यान, ॲडलेडसारख्या आपल्या आवडत्या मैदानावरही कोहलीला अपयश आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दुसऱ्या मॅचमध्ये आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. यामुळे ही ऑस्ट्रेलियातील त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असू शकते, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, तो दौरा अर्धवट सोडून जाणार नाही आणि तिसरा वन-डे खेळणार असल्याचे स्पष्टीकरण क्रीडा पत्रकारांनी दिले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ही तीन मॅचची एकदिवसीय सिरीज 2-0 ने जिंकली असून, 2027 च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 7:15 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 3rd ODI : 82 शतक ठोकणाऱ्या विराटला पार्टनरने दिली संजीवनी, दाखवून दिली किंग कोहलीची सर्वात मोठी चूक!


